

Anna Hazare Hunger Strike: ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे मोठ्या कालावधीनंतर पुन्हा एकदा आमरण उपोषण करणार आहेत. या उपोषणाची तारीख आणि ठिकाणही ठरलं असून लवकरच आण्णा राज्यातील महायुती सरकारला घाम फोडणार आहेत. त्यांच्या या उपोषणावर आता सरकार कशा पद्धतीनं प्रतिसाद देतंय हे पाहावं लागणार आहे.
आण्णा हजारेंनी आपल्या जुन्याच मागण्यांपैकीच्या लोकायुक्त कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. यासंदर्भात त्यांनी सरकारला एक सविस्तर पत्रही लिहिलं आहे. यात ते म्हणतात, २८ डिसेंबर २०२२ रोजी विधानसभेत आणि १५ डिसेंबर २०२३ रोजी विधानपरिषदेत हे विधेयक मंजूर झालं. पण दोन वर्षे उलटल्यानंतरही या कायद्याची अंमलबजावणी होत नाहीए. यावरुन लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी करण्याची सरकारची इच्छाच नसल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळं आपण आमरण उपोषणाचा पर्याय निवडला आहे.
३० जानेवारी २०२६ रोजी महात्मा गांधींच्या पुण्यतिथीदिनीच आण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी इथल्या यादवबाबा मंदिरात उपोषणाला बसणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळं आण्णा हजारेंच्या या नियोजित आमरण उपोषणाला अद्याप दीड महिन्याचा अवधी शिल्लक असल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या मागण्यांबाबत आणि लोकायुक्तांच्या अंमलबजावणीबाबत काय निर्णय घेतात याकडं सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.