Suresh Dhas Jayant Patil clash : अधिवेशनात 3 दिवस शांत बसलेले सुरेश धस अचानक आक्रमक; जयंत पाटलांसोबत खडाजंगी, सगळा राग काढला बाहेर...

विधानसभेत हैदराबाद इनामे आणि रोख अनुदाने रद्द करावी, सुधारणा विधेयकावरच्या चर्चेवरून धस आणि जयंत पाटील यांची जुंपली होती.
Suresh Dhas, Jayant Patil
Suresh Dhas, Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर पहिले अधिवेशन गाजवणारे भाजपचे आमदार सुरेश धस तीन दिवसांपासून शांत होते. महायुतीच्या सरकारचे मंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांच्या विरोधात त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण त्यांनी लावून धरल्याने मुंडे यांची मंत्रिमंडळातून गच्छंती झाली होती.

आज धस पुन्हा आक्रमक झाले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचे सरकार असताना राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याला कसा त्रास दिला, ओढून ताणून आपल्याला गोवण्यात आले, पोलिसांचा ससेमिरा लावल्याचा थेट आरोप केला. यावरून त्यांची आणि जयंत पाटील यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली.

विधानसभेत हैदराबाद इनामे आणि रोख अनुदाने रद्द करावी, सुधारणा विधेयकावरच्या चर्चेवरून धस आणि जयंत पाटील यांची जुंपली होती. सुरेश धस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यानंतर ते भाजपात सहभागी झाले. निवडून आल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. तेव्हापासून आपला त्रास वाढला. काही नेत्यांनी आपल्या बदनामीची मोहीम उघडली होती. संबंध नसताना अनेक प्रकरणात गोवण्यात आले. रात्री बे रात्री पोलिसांना घरी पाठवले जायचे. चौकशी केली जायची, असे आरोप धस यांनी केले.

Suresh Dhas, Jayant Patil
Ladki Bahin scheme update : ‘लाडक्या बहिणीं’साठी आनंदाची बातमी; E-KYC करताना झालेल्या चुकांबाबत फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

अधिकार आणि संबंध नसताना गुन्हे दाखल करण्यात आले. सोशल मीडियावरून बदनामी केली, असाही आरोप त्यांनी केला. त्यांचा सर्व रोख धनंजय मुंडे यांच्याकडे होता. त्यानंतर अजित पवार महायुतीत सहभागी झाले. महायुतीची सत्ता आल्यानंतर धनंजय मुंडे मंत्री झाले. या दरम्यान मस्साजोगमध्ये सरपंच देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण समोर आले. धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना पिक विमा योजनेतील घोटाळे बाहेर काढून त्यांनी खळबळ उडवून दिल होती.

Suresh Dhas, Jayant Patil
Lok Sabha Session Live : धक्कादायक : लोकसभेत अध्यक्षांसमोर खासदार काढतोय ई-सिगारेटचा ‘धूर’; जोरदार गदारोळ, कारवाई होणार?

आरोपांमुळे मुंडे यांना विधानसभेच्या कामकाजात भाग घेता आला नव्हता. देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण गाजल्याने धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून गच्छंती झाली. त्यानंतर सुरेश धस शांते झाले होते. आज त्यांचा राग पुन्हा उफाळून आला. त्यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकाळात राष्ट्रवादी काँग्रेसने कसा कसा त्रास दिला याची उजळणीच विधेयकावर चर्चेच्या माध्यमातून केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com