Maharashtra Politics : खासदारांच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे हे मैदानात उतरले आहे. वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचा दौरा करत त्यांनी फुटलेले खासदार संजय देशमुख यांच्यावर जोरदार प्रहार केला. मात्र, त्यांच्या दौऱ्याला २४ तास उलटत नाही तोच यवतमाळमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आणि पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आयोजित केलेल्या या दौऱ्यानंतर लगेचच यवतमाळ तालुक्यातील तब्बल १५ प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे सामूहिक राजीनामे दिले आहेत.
उद्धव ठाकरेंनी आयोजित केलेल्या सभेला जे 15 पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनीच राजीनामा दिल्याने यवळमाळच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ठाकरेंनी पाठ फिरताच या पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे थेट जिल्हा संपर्क प्रमुखांकडे सुपूर्द केले. राजीनामा पत्रात सर्वांनी 'वैयक्तिक कारणास्तव' पद सोडत असल्याचे म्हटले आहे. मात्र. या सामूहिक राजीनाम्यामागे अंतर्गत नाराजी असल्याची चर्चा आहे.
यवतमाळ-वाशिम हा मतदारसंघातील ठाकरेंचे खासदार संजय देशमुख हे शिंदेंच्या शिवसेनेत गेल्याने पक्ष अडचणीत आला आहे. येथे पुन्हा एकदा पक्षाची पकड मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी स्वतः मैदानात उतरले आहेत. मात्र, त्यांच्या दौऱ्यानंतर अवघ्या २४ तासात पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याने पक्षसंघटना कमकुवत होत असल्याचे दिसून येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.