Shivsena UBT and Congress Sarkarnama
विदर्भ

Shivsena UBT and Congress : '..तर आम्ही काँग्रेसचे उमेदवार पाडू' ; नागपुरात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा इशारा!

Nagpur Mahavikas Aghdi News : 'नेत्यांनी एकमेकांच्या खाद्यावर हात टाकून आमच्यात मतभेद नसल्याचे स्पष्ट केले असले, तरी...'

Rajesh Charpe

Vidhan sabha Election 2024 : नागपूर शहरात दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघावरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये घमासान सुरू आहे. यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या शहरात उद्धव सेनेचे अस्तित्व नाही आणि ताकद नाही या वक्तव्याने शिवसैनिक चांगलेच चिडले आहेत. नाना पटोले यांनी शिवसेनेची माफी मागावी अन्यथा आम्ही एकाही मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचे काम करणार नाही.

तसेच उमेदवारही पाडू असा इशारा ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी दिला आहे. नेत्यांनी एकमेकांच्या खाद्यावर हात टाकून आमच्यात मतभेद नसल्याचे स्पष्ट केले असले, तरी स्थानिक कार्यकर्त्यांचा रोष कसा दूर करणार असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

दक्षिण नागपूर विधानभा मतदारसंघावर ठाकरे गटाने दावा सांगितला आहे. नागपूर ग्रामीणमध्ये एक आणि शहरात एक असे दोन मतदारसंघ शिवसेनेने महाविकास आघाडीकडे मागितले आहेत. मात्र शहरातील एकही मतदारसंघ काँग्रेस(Congress) सोडायला तयार नाही.

तर मतदारसंघ ठाकरे गटाला सोडल्याची चर्चा शुक्रवारी शहरात पसरली होती. त्यानंतर लगेच काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बैठक बोलावली होती. मात्र नाना पटोले यांनी अद्याप काहीच फायनल झाले नसल्याचे सूचना दिली. त्यानंतर बैठक रद्द करण्यात आली होती. दक्षिण नागपूर मतदारसंघावर पटोले आणि संजय राऊत(Sanjay Raut) यांच्यात चांगलीच जुंपली होती. दोन्ही नेत्यांनी ही जागा सोडणार नाही हे स्पष्टच सांगून टाकले होते.

राऊत यांची मागणी चुकीची आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे शहरात अस्तित्व नाही, असे नाना पटोले यांचे म्हणणे आहे. त्यावर आज (शनिवार) शिवसैनिकांनी बैठक घेऊन आपली ताकद दाखवून देण्याचा निर्धार केला. नाना पटोले यांना आमची ताकद दाखवून देऊ, नागपूरमध्ये ठाकरे गटाला जागा सोडली नाही, तर आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे काम करणार नाही, सर्वच उमेदवार पाडू असाही इशारा देण्यात आला.

2019च्या निवडणुकीत दक्षिण, मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार अवघ्या तीन ते चार हजार मतांच्या फरकांनी पराभूत झाले आहेत. महाविकास आघाडीत बिघाडी झाल्यास याचा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT