Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दिकींच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट! ; राजस्थानमधून..

Baba Siddique Murder Case and Mumbai Police Action : या खळबळजनक प्रकरणात आतापर्यंत अटक झालेल्यांची एकूण संख्या आता नऊ झाली आहे, तर तीन जण फरार आहेत.
Baba Siddiqui
Baba SiddiquiSarkarnama
Published on
Updated on

Baba Siddique Murder Case Update : बाबा सिद्दिकींच्या हत्येप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसे दररोज नवीन खुलासे होत आहेत. आता मुंबई गुन्हे शाखेच्या तपासात ही बाब समोर आली आहे की, ज्या अत्याधुनिक पिस्तुलातून गोळ्या झाडून बाबा सिद्दिकींची हत्या केली गेली होती. ते राजस्थानमधून मुंबईत आणले गेले होते.

ही माहिती समोर आल्यानंतर गुन्हे शाखेची एक टीम राजस्थानमध्ये(Rajasthan) पोहचली आहे. जेणेकरून हे समजेल की राजस्थानमध्ये अशाप्रकारची अत्याधुनिक शस्त्रे कठून येत आहेत? सूत्रांनी हा देखील दावा केला आहे की, पाकिस्तानातून अनेकदा असे शस्त्र राजस्थानात सीमा पार करून आणले जातात. सध्या गुन्हे शाखा शस्त्र पुरठवा करणाऱ्या मूळ स्त्रोताचा शोध घेतल आहे.

Baba Siddiqui
Zeeshan Siddique : गृहमंत्री फडणवीसांची भेट, काही क्षणातच झिशान सिद्दिकींची 'ती' पोस्ट, नेमकं काय सुचवायचंय..?

बाबा सिद्दिकींच्या(Baba Siddique) हत्येप्रकरणी शूटर्सना शस्त्र आणि रसद उपलब्ध करून देण्याच्या आरोपात, शुक्रवारी पाच जणांना अटक केली गेली आहे. मुंबई पोलिसांच्या एका आधिकाऱ्यांने ही माहिती दिली. या खळबळजनक प्रकरणात आतापर्यंत अटक झालेल्यांची एकूण संख्या आता नऊ झाली आहे, तर तीन जण फरार आहेत.

Baba Siddiqui
Baba Siddique : बाबा सिद्दिकींवर गोळीबार झाला तेव्हा काऊंटर फायरिंग का केली नाही? सुरक्षारक्षकाने घटनाक्रमच सांगितला

राष्ट्रवादी काँग्रेसचे(NCP) नेते माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर त्यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दिकी गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांवर सूचक पोस्ट शेअर करत आहेत.

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर त्यांनी 'न्याय हवा', अशी पोस्ट केली होती. त्यानंतर आता, 'लपलेले सर्व काही सुस्त नाही अन् दिसते ते सर्वच बोलत नाही', असा मजकूर एक्स माध्यमांवर शेअर केला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com