Kiren Rijiju, Rahul Gandhi Sakarnama
विदर्भ

Kiren Rijiju: काँग्रेस संविधानाचे मारेकरी, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी निशाणा साधला

Kiren Rijiju Criticized Congress: देशाल संविधान देणाऱ्या बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकसभेच्या निवडणुकीत पराभव करण्याचे कारस्थान काँग्रेसने रचले होते. ते केंद्रीय कायदे मंत्री असताना त्यांना त्रास दिला जात होतो, असे किरेन रिजिजू म्हणाले.

Rajesh Charpe

Political News: लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या संविधान बदलणारच्या प्रचाराने भाजपला जोरदार धक्का बसला होता. विधानसभेतही आघाडी याच मुद्याचे राजकारण करण्याची शक्यता असल्याने भाजपतर्फे आधीपासूनच खबरदारी घेणे सुरू केले आहे. यावेळी भाजपने केंद्रीय कायदे मंत्री किरेन रिजिजू यांना निवडणुकीपूर्वीच मैदानात उतरवले आहे.

आज (शुक्रवारी) नागपूरमध्ये दीक्षाभूमीला रिजिजू यांनी अभिवादन केले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वाधिक अपमान काँग्रेसने केला. त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला भाग पाडले, असे असतानाही काँग्रेसच्या भूलथापांना आमचा समाज बळी पडला. काँग्रेस पक्ष हाच संविधानाचा मारेकरी आहे. त्यांना मतदान केल्यास जनता आपल्याला कधीच माफ करणार नाही, असे रिजिजू म्हणाले.

देशाल संविधान देणाऱ्या बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकसभेच्या निवडणुकीत पराभव करण्याचे कारस्थान काँग्रेसने रचले होते. ते केंद्रीय कायदे मंत्री असताना त्यांना त्रास दिला जात होतो. याच कारणाने त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

देशात आणीबाणी लाऊन काँग्रेसने संविधानाची हत्या केली होती. ज्यांनी बाबसाहेबांच्या संविधानाला कधी मानले नाही तेच लोक आता संविधान हाती घेऊन राजकारण करीत आहेत, अशी टीका रिजिजू यांनी केली.

लोकसभेच्या निवडणुकीत भाजप संविधान बदलणार असल्याची भीती दाखवली.दलित आणि आदिवासांनी मूर्ख बनवून मते घेतली. मात्र नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी सर्व प्रथम संविधान यात्रा काढली होती, असे रिजिजू म्हणाले.

पंतप्रधान झाल्यानंतर संविधान दिवस साजरा करणे सुरू केले. बाबासाहेबांचे लंडनमधील घर खरेदी करून स्मारक बनवले. दीक्षाभूमी आणि चैत्यभूमीचा विकास केला. आता महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात संविधान भवन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे संविधानाचे खरेखुरे रक्षणकर्ते कोण याचा सारासार विचार बौद्ध समाजाने करावा, असे आवाहन देखील रिजिजू यांनी केले.

वक्फ विधेयक मंजूर होणार

देशातील मुस्लिमांशिवाय काँग्रेसने जैन, ख्रिश्चन, पारशी यांना कधीच अल्पसंख्य मानले नाही. कायम त्यांची उपेक्षा केली. अल्पसंख्यक विभाग हा फक्त मुस्लिम समाजासाठी स्थापन केला होता. या विभागावर फक्त मुस्लिम समाजालाचा प्रतिनिधित्व दिले जात होते.

मात्र भाजपने हा गैरसमज दूर केला. सर्वांना त्यावर प्रतिनिधित्व दिले. वक्त जमिनीवर काही श्रीमंत मुस्लिमांना कब्जा केला आहे. गोरगरीब मुस्लिमांना त्याचा लाभ दिला जात नाही. त्यामुळे वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक आणले आहे. ते नक्कीच मंजूर होईल असाही दावा किरेन रिजिजू यांनी यावेळी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT