NCP Vs BJP : कोल्हापूर पाठोपाठ सांगलीतही पवारांचा भाजपला 'जोर का झटका'; माजी आमदारानं कमळ सोडलं, तुतारीवर लढणार...?

Rajendra Deshmukh And Vaibhav Patil : राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांनी सांगली दाखल होताच भाजपाला जोरदार धक्का दिला आहे. भाजपाचे खानापूर-आटपाडीचे माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत तुतारी हातात घेतली आहे.
Sharad Pawar | Devendra Fadnavis
Sharad Pawar | Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur And Sangli News : कोल्हापूर पाठोपाठ सांगली जिल्ह्यात ही भाजपला मोठे खिंडार पडले आहे. खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनी आज राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. पक्षप्रवेश करत असताना भाजपने आम्हाला शिवसेनेला विकली आहे. असा आरोप करत त्यांनी भाजपला राम राम ठोकत आगामी विधानसभा निवडणुकीला उमेदवारीचे संकेत दिलेत.

त्या पाठोपाठ राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी देखील पवार यांच्यासोबत बंद खोलीत चर्चा केली. त्यामुळे उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे. ते राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आता जिल्ह्यात सुरू आहे. त्याचबरोबर मंत्री सुरेश खाडे यांचे एकेकाळचे स्वीय सहाय्यक आणि भाजपचे नेते मोहन व्हनखंडे देखील काँग्रेसच्या वाटेवर असल्याची शक्यता आहे.

आटपाडी खानापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीमधून संभाव्य उमेदवार म्हणून दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे चिरंजीव सुहास बाबर यांना उमेदवारीचे संकेत आहेत. त्यामुळे भाजपचे नेते राजेंद्र देशमुख यांची गोची झाल्यानंतर त्यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत थेट पक्ष प्रवेश करत भाजपला रामराम ठोकला आहे.

त्याचबरोबर मिरज विधानसभा मतदारसंघातील भाजपचे नेते मोहन व्हनखंडे यांची देखील उमेदवारीवरून घोषित झाल्यानंतर ते देखील काँग्रेसच्या वाटेवर आहेत. अशी शक्यता वर्तवली जात आहे. कोल्हापूर पाठोपाठ भाजपला (BJP) ही खिंडार पडल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठा चर्चेचा विषय बनला आहे.

Sharad Pawar | Devendra Fadnavis
Rahul Gandhi News : चौदा वर्षांनंतर राहुल गांधी कोल्हापुरात, पश्चिम महाराष्ट्रात करणार मशागत

अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील शरद पवारांची भेट घेऊन जवळपास तासभर बंद खोली चर्चा केली. या भेटीमुळे वैभव पाटील विधानसभेच्या पार्श्वभूमीवर तुतारी हाती घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटलांनी वडील माजी आमदार सदाशिव पाटील यांच्यासह सांगलीमध्ये शरद पवारांची भेट घेतली आहे. खानापूर-आटपाडी विधानसभा मतदार संघातून महायुतीतून अजित पवार गटाकडून वैभव पाटील हे इच्छुक आहेत, मात्र आटपाडी मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला जाणारा असल्याने वैभव पाटलांनी शरद पवारांच्या घेतलेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाली होती,

दरम्यान, वैभव पाटील यांनी ही भेट कौटुंबिक असल्याची स्पष्ट केले आहे. आपले आजोबा हणमंतराव पाटील आणि शरद पवारांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यातून आपण वडिलांसोबत शरद पवारांची भेट घेतल्याचं स्पष्ट करत अजित पवार राष्ट्रवादी गटामध्येच आपण राहणार असल्याचे सांगितले आहे.

Sharad Pawar | Devendra Fadnavis
Anand Chandanshive : राष्ट्रवादीत आनंद चंदनशिवेंना 'प्रमोशन'; राज्याच्या राजकारणात मिळाली महत्वाची जबाबदारी

'भाजपाने आम्हाला शिवसेनेला विकले...'

राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांनी सांगली दाखल होताच भाजपाला जोरदार धक्का दिला आहे. भाजपाचे खानापूर-आटपाडीचे माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत तुतारी हातात घेतली आहे. भाजपाने आम्हाला शिवसेनेला विकल्याचा घणाघाती आरोप करत भाजपा सोडल्याचं स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात आपण जाहीर प्रवेश केल्याचं शरद पवारांच्या भेटीनंतर राजेंद्रअण्णा देशमुख यांनी स्पष्ट केले आहे,

भाजपाने आम्हाला शिवसेनेला विकल्याचा घणाघाती आरोप राजेंद्र अण्णा देशमुख यांनी केला आहे, त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून आपण इच्छुक असल्याचे देखील राजेंद्र अण्णा देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

Sharad Pawar | Devendra Fadnavis
Dhananjay Mahadik to Rahul Gandhi : शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी कोल्हापुरात येणाऱ्या राहुल गांधींवर महाडिकांची प्रश्नांची सरबत्ती!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com