Washim News : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी नेहमीच ओळखले जातात. आता गडकरी यांनी वाशीममध्ये एका कार्यक्रमात धडाकेबाज भाषण करत एक किस्सा सांगितला आहे.
"मी गेल्या अनेक वर्षांपासून मंत्री आहे. पण विमानतळावर मला घेण्यासाठी एक कुत्रंही येत नाही. मात्र, एक कुत्रा येतो. कारण मला झेड प्लस सिक्युरिटी आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत दोन पोलिसवाले असतात. पण पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार कुणीही येत नाही", असं गडकरी म्हणाले.
गडकरी वाशीम दौऱ्यावर आले असता, एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी दमदार भाषण केले. या वेळी त्यांनी आमदार-खासदारांसह पदाधिकाऱ्यांनाही चांगलच सुनावलं. तसेच गडकरींनी कॉन्ट्रॅक्टरलाही इशारा दिला. "रस्ता खराब झाला तर मी कॉन्ट्रॅक्टरला बुलडोझरखाली टाकेन", अशी थेट तंबीच गडकरींनी या वेळी दिली.
"गेल्या ४५ वर्षांमध्ये मी कुणालाही खोटे आश्वासन दिले नाही. जे काम होतं ते मी स्पष्ट सांगतो. त्यामुळे काम का झालं नाही ? असे मला कुणीही विचारू शकत नाही. पण राजकारणात खोटं बोलण्याची गरज नाही. आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मी पोस्टरदेखील लावणार नाही. बॅनरदेखील लावणार नाही, कुणाला चहापाणी करणार नाही, पण सेवा मात्र इमानदारीने करेल", असं गडकरी म्हणाले.
दरम्यान, नितीन गडकरी यांनी आमदार-खासदारांसह पक्षातील पदाधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. दबाव आणत ठेकेदारांना त्रास देऊ नका, असे सांगत त्यांनी पदाधिकाऱ्यांसह आमदार-खासदारांचे एक प्रकारे कान टोचले.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.