Raver Loksabha News : रावेरमध्ये भाजपला आपला 'हुकमी' एक्का मैदानात उतरवण्याची गरज नाही ? काय आहे समीकरण...

Girish Mahajan News : रावेर लोकसभा मतदारसंघातील भाजपची मजबूत स्थिती पाहता महाजन यांना उमेदवारी देण्याची गरज नसल्याची स्थिती आहे.
Raksha Khadse, Girish Mahajan News
Raksha Khadse, Girish Mahajan NewsSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon Political News : मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपने केंद्रीय मंत्र्यांना उमेदवारी दिल्याने महाराष्ट्रात आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप राज्यातील मंत्र्यांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यात रावेर मतदारसंघातून गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा सुरू आहे. परंतु रावेर लोकसभा मतदारसंघातील भाजपची मजबूत स्थिती पाहता महाजन यांना उमेदवारी देण्याची गरज नसल्याची स्थिती आहे.

जळगाव जिल्ह्यात जळगाव आणि रावेर हे दोन मतदारसंघ आहेत. गेल्या तीस वर्षांपासून हे दोन्ही मतदारसंघ भाजपचे बालेकिल्ले आहेत. या दोन्ही मतदारसंघांत निवडणुकीचे तीस वर्षांतील इतिहास पाहता विरोधी पक्षाचा उमेदवार हा कडवी लढत देऊ शकलेला नाही. गेल्या निवडणुकीत तर जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपचे (BJP) विद्यमान खासदार ए. टी. पाटील यांना उमेदवारी नाकारून स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केली. त्यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतरही त्यांची उमेदवारी रद्द करून ऐनवेळी आमदार उन्मेष पाटील यांना संधी दिली. त्यावेळी भाजपमध्ये नाराजी असल्याचे दिसत होते.

Raksha Khadse, Girish Mahajan News
MP Elections : मध्य प्रदेशात काँग्रेस बाजी मारणार की भाजप सत्ता राखणार ? ओपिनियन पोल पाहून सर्वच चकित !

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे गुलाबराव देवकर उमेदवार होते. त्यांनी प्रचारही सुरू केला होता, त्यांना प्रतिसाद चांगला मिळत होता. ऐनवेळी उमेदवारी मिळालेले उन्मेष पाटील यांचा पराभव होणार असे वाटत होते. मात्र, निकालात उन्मेष पाटील हे लाखाच्या फरकाने निवडून आले. याचे कारण म्हणजे जिल्ह्यात पक्षाचे केडर मजबूत आहे. अगदी रावेर लोकसभा मतदारसंघात हीच स्थिती आहे. या रावेर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे खासदार आहेत. एकनाथ खडसे (Eknath Khadse) भाजपमध्ये असताना त्यांची खानदेशात पक्षावर मजबूत पकड होती.

त्यामुळे २०१४ मध्ये विद्यमान खासदार दिवंगत हरिभाऊ जावळे यांना उमेदवारी नाकारून रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी त्या मोठया मताधिक्याने निवडून आल्या. २०१९ मध्येही पक्षाने त्यांना उमेदवारी दिली दुसऱ्यांदा त्या मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या आहेत. मात्र, त्यानंतर विधानसभा निवडणुकीत खडसे यांना उमेदवारी नाकारून त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, त्या पराभूत झाल्या. पुढे खडसे यांनी पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात प्रवेश केला.

Raksha Khadse, Girish Mahajan News
Akola Lok Sabha Constituency : अकोला लोकसभेसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची चाचपणी; 'ही' नावे चर्चेत...

रक्षा खडसे या भाजपमध्ये राहिल्या कोणत्याही राजकीय वादात न पडता त्यांनी पक्षात खासदार म्हणून त्यांनी काम सुरू ठेवले आहे. आजही त्या पक्षाचे काम करीत आहेत. त्यांचा जनसंपर्क सुरू आहे. सासरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असले तरी भाजप विरोधात काम केल्याची एकही तक्रार त्यांच्याविरोधात नाही. शिवाय त्यांच्याबाबत पक्षातही नाराजी नाही. केवळ सासरे राष्ट्रवादी पक्षात आहेत, त्यामुळे त्यांना भाजपची उमेदवारी मिळणार नाही, असे सांगितले जात आहे. दुसरीकडे आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे यांना उमेदवारी देण्याची चर्चा सुरू आहे, त्यामुळे एकाच घरात सासरे विरुद्ध सून अशी लढत न होता भाजप एकनाथ खडसे यांचे कट्टर विरोधक मंत्री गिरीश महाजन यांना मैदानात उतरविणर असल्याची जोरदार चर्चा आहे.

महाजन हे पक्षाचे राज्यस्तरावरील नेते आहेत, आज ते सरकारचे आणि पक्षाचे संकटमोचक म्हणून ओळखले जातात. जळगाव जिल्ह्यात भाजप दोन्ही मतदारसंघात मजबूत आहे. सध्या तरी रावेर लोकसभा मतदारसंघात पक्षाला धोका नाही. केवळ सासरे भाजपमध्ये आहेत म्हणून पक्षाचा उमेदवार बदलायचा याव्यतिरिक्त दुसरे कारण नाही. मग अशा मजबूत स्थितीत पक्ष थेट महाजन यांच्यासारखा हुकमी पत्ता या ठिकाणी डावाला लावणार नाही. शिवाय रावेर लोकसभा मतदारसंघ हा लेवा पाटील बहुल आहे. या समाजाचा एकमेव खासदार या मतदारसंघातून निवडून जातो. त्यामुळे गेल्या अनेक निवडणुकीत भाजप व विरोधी काँग्रेस पक्षातर्फे लेवा पाटील समाजाचा उमेदवार दिला जातो. गेल्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मनीष जैन यांना उमेदवारी दिली होती. त्यांना पराभव पत्करावा लागला. त्याला आघाडी अंतर्गत करणेही होती.

या मतदारसंघात जामनेर, मुक्ताईनगर, भुसावळ, रावेर-यावल व चोपडा विधानसभा मतदारसंघ येतात. रावेर यावल मतदारसंघात काँग्रेसचा आमदार वगळता, जामनेर, भुसावळ मतदारसंघात भाजप आमदार आहेत, तर मुक्ताईनगर, चोपडा येथे शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार आहेत. त्यामुळे आज तरी येथे भाजपची ताकद मोठी आहे. त्यामुळे भाजपने पुन्हा रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली तरी त्यांचा पराभव होईल अशी स्थिती नाही आणि भाजपला उमेदवार बदलायचा असेलच तर माजी दिवंगत खासदार हरिभाऊ जावळे यांचे चिरंजीव अमोल जावळे यांना पक्षाने रावेर लोकसभा क्षेत्र जिल्हाध्यक्ष पद दिले आहे, त्यांची तयारी सुरू आहे.

महाजन हे पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्य मागे आपली ताकद लावून त्यांना निवडून आणू शकतात. शिवाय खानदेशात असलेल्या चार लोकसभा जगांसाठी पक्षाला त्यांचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे गरज नसताना पक्ष त्यांना उमेदवारी देऊन मतदारसंघात अडकवण्याचा निर्णय घेणार नाही असे दिसत आहे. अर्थात महाजन यांनीही पक्षात आपल्या लोकसभा उमेदवारीची चर्चा नसल्याचे सांगितलेच आहे. मात्र, राजकारणात फुल स्टॉप कधीच नसतो, हे मात्र नक्की.

Edited by : Amol Jaybhaye

Raksha Khadse, Girish Mahajan News
Jayant Patil News : 'योगी आदित्यनाथ गडावर आले आणि मुख्यमंत्री झाले, लंके तुम्हीही या !' पाटलांनी घेतली फिरकी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com