VBA Congress alliance 1 Sarkarnama
विदर्भ

VBA Congress alliance : 'पहले आप, पहले आप' अन् आघाडीत कोणीच नाही! काँग्रेस अन् वंचितचं फिस्कटलं!

No Alliance Between Vanchit Bahujan Aaghadi and Congress in Municipal Elections Prakash Ambedkar : महापालिका निवडणुकीत वंचित आणि काँग्रेस आघाडीसाठी पहिला प्रस्ताव कोण देणार, यावरून आघाडी फिस्कटल्याचं समोर आलं आहे.

Pradeep Pendhare

Municipal election Maharashtra : काँग्रेस अन् वंचित बहुजन आघाडीची महापालिका निवडणुकांमध्ये आघाडीवरून फिस्कटलं आहे. अकोलासह राज्यात इतर कोणत्याच महापालिकांमध्ये वंचित आणि काँग्रेसचे आघाडी होणार नसल्याचं जाहीर करण्यात आलं. वंचितकडून ही घोषणा करण्यात झाल्याने, काँग्रेस राज्यात महापालिका निवडणुकांसाठी एकटी पडली आहे.

मुंबई महापालिकेत देखील वंचितला बरोबर घेण्याच्या काँग्रेसच्या मनसुब्यावर पाणी फिरलं आहे. वंचित अन् काँग्रेसमध्ये आघाडीचा पहिला प्रस्ताव देण्यावरून वाद पेटला अन् 'पहले आप, पहले आप'मध्ये आघाडीची गाडी सुटून गेली. वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी यावरून काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंची युती झाली. तशी अधिकृत घोषणा झाली. तत्पूर्वी बरचं राजकीय घडामोडी घडल्या. या युतीपासून काँग्रेसने (Congress) दूर राहण्याचं ठरवलं. मनसेची विचारसरणीशी जुळत नसल्याचे कारण देत, काँग्रेस या युतीपासून लांब राहिलं अन् वंचित बहुजन आघाडीबरोबर आघाडी करणार असल्याचं जाहीर केलं.

वंचित बहुजन आघाडीबरोबर (VBA) चर्चा सुरू असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले. मुंबईसह राज्यातील काही महापालिकांमध्ये आघाडी होईल, असे सांगण्यात आले. विजय वडेट्टीवार यांनी, तर आघाडी होणाऱ्या महापालिकांचे नाव देखील सांगून टाकले. पण आज वंचितकडून आघाडी होणार नसल्याचे सांगण्यात आल्याने काँग्रेसची पुरती कोंडी झाली आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी कालच्या पत्रकार परिषदेत, राज्यात 12 ठिकाणी एकनाथ शिंदे शिवसेना आणि 10 ठिकाणी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडीची चर्चा सुरू आहे, असे सांगितले होते. तसंच भाजप वगळून इतर समविचारी पक्षांची आघाडीची तयारी आहे. पक्षांच्या प्रमुखांनी आघाडी अन् युती, करण्याचे अधिकार पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना दिले आहेत. त्यानुसार वंचितच्या पदाधिकाऱ्यांना देखील दिले आहेत, असेही प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केले.

पहिला प्रस्ताव कोण देणार, यावरून वाद

परंतु आघाडी फिस्कटल्याचे प्रकाश आंबेडकरांनी खापर काँग्रेसवर फोडले आहे. तसंच पक्षाचे माजी आमदार नतिकोद्दीन खतीब यांनी, आघाडी पहिला प्रस्ताव प्रस्ताव कोणी द्यावा, यावरून दोन्ही पक्षात ओढाताण होती. 'पहले आप, पहले आप'वरूनचं आता दोन्ही पक्षातील आघाडीची चर्चा थांबली. आघाडीबाबत काँग्रेसकडून प्रस्ताव आला नाही. त्यामुळे दिलेला वेळ संपला आणि महापालिकेत काँग्रेससोबत आघाडी होणार नाही, असे सांगितले.

काँग्रेसवाले येतात, बसतात अन् बाहेर वेगळंच पसरवतात

प्रकाश आंबेडकर म्हणाले, 'आम्ही तयार आहो, पण ते तयार नाहीत', हे दाखवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न. यायचं बसायचं, आमची झालं, असं म्हणायचं; मग, बाहेर भलतंच काहीतरी पसरून द्यायचं, अशी काँग्रेसची भूमिका आहे.' पण भाजप-आरएसएसच्या भूमिकेविरोधात गांधीवादी मार्गाने लढण्याची आमची पुरती तयारी आहे, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.

प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसला पुन्हा टोला

काँग्रेसच्या या भूमिकेवर टिका करताना, आघाडी होणार नसल्याचे भाष्य करून, काही तासं उलटत नाही, तोच प्रकाश आंबेडकर यांनी नांदेड इथं पुन्हा प्रतिक्रिया दिली आहे. 'काँग्रेसने आघाडीवर पुन्हा बोलणीची इच्छा दाखवली आहे. अजून काही संघटना आहेत त्यांच्याशी बोलणी सुरू आहे. दोन दिवसांत अंतिम निर्णय होईल. आता चर्चा करताना काँग्रेसने स्कॅनर लावला पाहिजे. काँग्रेसी किती आहेत आणि काँग्रेसमध्ये राहून त्यांचा आत्मा दुसऱ्या पक्षात किती जणांचा आहे, हे त्यांनी पाहावं,' असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT