Pankaj Tadas  sarkarnama
विदर्भ

Pankaj Tadas News : पूजा तडस यांच्या गंभीर आरोपांना पतीचे प्रत्युत्तर, 'हनी ट्रॅपचा प्रयत्न...''

Roshan More

Loksaba Election 2024 : वर्ध्यातील भाजपचे खासदार रामदास तडस यांच्यावर त्यांची सून पूजा तडस हिने गंभीर आरोप केले. आपल्या चारित्र्यावर संशय घेत राॅडने मारहाण करण्यात आली. बाळाच्या डीएन टेस्ट करण्याची मागणी करण्यात आल्याचा आरोप पूजा तडस यांनी केला. पूजा या वर्धामधून रामदास तडस यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणून उभ्या राहणार आहेत. नरेंद्र मोदींनी आपल्याला आणि आपल्या बाळाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी पूजा तडस यांनी केली आहे. पूजा यांच्या आरोपांवर त्यांचे पती पंकज तडस यांनी उत्तर देत हे आरोप निवडणुकीच्या काळातच का केले गेले, हे हनीट्रॅप प्रकरण असून न्यायालयात या संबधी पुरावे दिल्याचे पंकज यांनी सांगितले.

पंकज तडस म्हणाले 2020 मध्ये यांनी माझा हनिट्रॅप केला. या बाबत मी पुराव्यासहित न्यायलयात गेलो आहे. न्यायालयाने दहा लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. आणखी त्यात आरोपी वाढतील. आठ लोक न्यायलयात हजर झाले आणि त्यांना जामीनावर सोडण्यात आले. पूजा तडसला माझ्यावर आरोप करायचे आहे तर हीच वेळ का निवडली? 2020 पासून हे प्रकरण सुरू आहे. तीन वर्ष तुम्ही शांत बसता, कोर्टात हजर राहत नाहीय आणि मीडियासमोर उभे राहता हे राजकारण नाहीय का?

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आपले वडील रामदास तडस (Ramdas Tadas) यांचे घर आणि माझे घर हे वेगवेगळे आहे. आम्ही एका मोहल्यात राहतो. घराला घर लागून आहे पण त्यांनी मला बेदखल केल आहे, असे पंकज तडस यांनी सांगत त्यांचा या प्रकरणाशी काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. पूजा तडस यांच्यासोबत पत्रकार परिषद घेणाऱ्या सुषमा अंधारे यांच्यावरही पंकज यांनी टीका केली.

सुषमा अंधारे (sushma andhare) यांनी स्वतःच्या परिवारात थोडं झाकून बघा. आपल्या पतिसोबत आपण जुळवून घेत नाहीय आणि दुसऱ्याच्या संसारात आग टाकायला जातात. सुषमाताई हे धंदे बंद करा. हे राजकीय षडयंत्र आहे. जर राजकीय षडयंत्र नसतं तर राजकीय लोकांसोबत का बाईट देता, असा सवाल देखील पंकज यांनी उपस्थित केला आहे.

पूजा तडस यांच्या मागे दोन राजकीय नेते असल्याचा आरोप पंकज तडस यांनी केला. हे प्रकरण न्यायालयात असल्याने आपण जास्त भाष्य करणार नाही. न्यायालय जो निर्णय देईल तो आपण मान्य करू, असे सांगत पूजा तडस या न्याप्रविष्ठ प्रकरण आहे तिथे हजर राहत नाहीत. मात्र, पत्रकार परिषदेला हजर राहता. ज्यांनी नगर परिषद आणि ग्रामपंचायत लढली नाही ते लोकसभा लढत आहेत. या मागे दोन राजकीय नेत्यांचा हात असल्याचे पंकज तडस म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT