Sunil Kedar, Ashish Deshmukh Sarkarnama
विदर्भ

Vidarbha Politics : भाजप आमदार आशिष देशमुख करणार माजी मंत्र्याचीच 'नाकाबंदी'

Ashish Deshmukh Vs Sunil Kedar : कॅबिनेट मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाही त्यांनी देशमुखांचा अपक्ष लढून पराभव केला होता. तेव्हापासून केदारांना पराभूत करण्याचे अनेकदा प्रयत्न झाले. यावेळी मात्र आशिष देशमुखांनी सुनील केदार यांच्या पत्नीचा पराभव करून सर्व हिशेब फेडले.

Rajesh Charpe

Nagpur News : विधानसभेच्या निवडणुकीत सावनेर विधानसभा मतदारसंघातून निवडूण आल्यानंतर आता आमदार आशिष देशमुख (Ashish Deshmukh) हे याच मतदारसंघाचे माजी लोकप्रतिनिधी, माजी मंत्र तसेच जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते सुनील केदारांची ‘नाकाबंदी‘ करणार आहेत. देशमुखांनी आज केदारांचे गाव असलेल्या पाटणसावंगी येथे राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेला अवैध टोल नाका बंद करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे.

भाजप नेते आणि आमदार आशिष देशमुख आणि माजी मंत्री व काँग्रेसचे नेते सुनील केदार (Sunil Kedar) यांचे परंपरागत वैर आहे. काँग्रेसमध्ये असताना दोघांच्याही वडिलांपासून सुरू असलेले वैर आजही कायम आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणजित देशमुख हे सावनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. त्यांच्याविरोधात सुनील केदारांनी बंड केले होते.

कॅबिनेट मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाही त्यांनी देशमुखांचा अपक्ष लढून पराभव केला होता. तेव्हापासून केदारांना पराभूत करण्याचे अनेकदा प्रयत्न झाले. यावेळी मात्र आशिष देशमुखांनी सुनील केदार यांच्या पत्नीचा पराभव करून सर्व हिशेब फेडले. आता त्यांची आर्थिक नाकाबंद करण्याचे प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे आता आणखी येथे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आमदार होताच आशिष देशमुख यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पाटणसावंगीतीला टोल नाका तत्काळ बंद करण्याचे निर्देश राष्ट्रीय महामार्ग प्राथिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिले. नागपूर छिंदवाडा मार्गावर अवघ्या 22 किलोमीटर अंतरावर दोन टोल नाके आहेत. ही अवैध वसुली खपवून घेतली जाणार नाही असाही इशारा त्यांनी दिला आहे. सावनेर-नागपूर महामार्गावर बेकायदा टोलनाका उभारण्यात आल्याने सर्वसामान्य वाहनधारकांच्या खिशाला बोजा बसत आहे.

छिंदवाडा मार्गावरील केळवद जवळ 22 किलोमीटर अंतरावर दोन टोल नाके आहेत. या माध्यमातून प्रवाशांकडून बेकायदेशीरपणे टोल वसूल केली जात आहे. नागपूर ते सौंसर जाणाऱ्या लोकांकडून दुप्पट टोल आकाला जात आहे. पाटणसावंगीचा टोल नाका सुरुवातीला सावनेर-पांढुर्णा मार्गावरील उमरी गावाजवळ उभारण्याची योजना होती. मात्र, दुप्पट टोल वसूल कराता यावा याकरिता तो पाटणसावंगीत हलवण्यात आला. यावर पंधरा वर्षांपासून येथील लोकप्रतिनिधी मौन बाळगून होते, याकडे लक्ष वेधून देशमुखांना माजी मंत्री केदारांना टोला लगावला.

नागपूर शहर जिल्ह्याचे ठिकाण असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना वारंवार यावे लागते. प्रत्येकवेळी त्यांना टोल भरावा लागतो. छिंदवाडा आणि पांढुर्णा परिसरातील लोकही वैद्यकीय उपचारांसाठी नागपूरला प्राधान्य देतात.

विशेष म्हणजे पाच वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी जिल्ह्यातील दोन टोलनाके हलवण्याचे आश्वासन दिले होते. त्यापैकी रामटेक-मनसर रोडवरचा नाका हलवण्यात आला होता. मात्र, पाटणसावंगीचा टोल नाका आजही कायम आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT