
Pune News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच करण्यात आला. यानंतर महायुतीतील मित्र पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ते नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे या मंत्रिमंडळ विस्ताराच्या कार्यक्रमालाच आरपीआयचे नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना बोलावलं गेलं नसल्याचं समोर आलं. याबाबत आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekar Bawankule) यांनी प्रतिक्रिया दिली आहेके
केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी आपल्या पक्षाला मंत्रिपदं दिलीच नाहीत, तसेच आपल्याला शपथविधी सोहळ्याला बोलावलं देखील नाही,अशी खंत व्यक्त केली.त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी (ता.16) पुणे दौऱ्यादरम्यान माध्यमांशी संवाद साधताना ही आपली चूक झाल्याची जाहीर कबुली दिली.
बावनकुळे म्हणाले, आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त करत साधं आपल्याला मंत्रिमंडळ विस्ताराला देखील बोलावलं नसल्याची खंत व्यक्त केली आहे. त्यावर बावनकुळे म्हणाले, रामदास आठवले यांना मी निमंत्रण पाठवलं होतं. मात्र, ते व्यवस्थितरित्या पोहोचलं नाही.
नागपूर आणि मुंबई अशा सातत्याच्या गडबडीमुळे मंत्रिमंडळ विस्ताराबाबतचं निमंत्रण देणं राहून गेलं. निमंत्रण घेऊन मी प्रदेशाध्यक्ष म्हणून स्वतः जाणं आवश्यक होतं. मात्र, माझ्याकडून ती चूक झाली आहे. मी आठवले यांची माफी मागितली आहे. आठवले यांना महायुतीत महत्वाचे स्थान असून त्यांना योग्य न्याय दिला जाईल, असं बावनकुळे म्हणाले.
भाजपामध्ये केंद्रीय नेतृत्व हे मंत्री मंडळाबाबत योग्य ते निर्णय घेत असतं. तसंच राष्ट्रवादी आणि शिवसेनेमधील वरिष्ठ नेते ज्या पद्धतीने शिफारस करतात, त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे. काहीवेळा राजकीय जीवनात थांबावं लागतं आणि नंतर पुढे जावं लागतं.
त्यानुसार सुधीर मुनगंटीवार आणि छगन भुजबळ हे समजून घेतील. कारण पक्षांमध्ये जो निर्णय होतो, तो मान्य करून पुढे जावं लागतं. सुधीर मुनगट्टीवार हे ज्येष्ठ नेते असून आत्तापर्यंत त्यांनी पक्षसंघटनेच्या विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला नसला तरी केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्याबाबत वेगळा विचार केला असू शकतो. यातून त्यांना आणखी मोठी जबाबदारी मिळू शकते, असं बावनकुळे म्हणाले.
छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले, छगन भुजबळ हे महायुतीचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच. मोठा कार्य महाराष्ट्रात आहे. त्यांना पक्षाकडून कोणतीतरी दुसरी जबाबदारी द्यायची असेल. त्यामुळे अजित पवार यांनी हा निर्णय घेतला असेल. मात्र, छगन भुजबळ यांच्याबाबत महायुतीतील सर्व मित्रपक्षांना आदर असल्याचं सांगितलं.
मंत्रिमंडळ विस्तारामध्ये घराणेशाही झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. याबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तारामध्ये घराणेशाहीचा नाही तर कर्तृत्वाचा विचार करून निर्णय घेण्यात आला आहे. घराण्याच्या आधारावर कर्तुत्वाचं मोजमाप होऊ शकत नाही. मंत्रिमंडळातील सर्व नेते कर्तुत्वाने मंत्री झाले आहेत असं बावनकुळे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.