Chhagan Bhujbal: मंत्रिपद डावलल्यानंतर नाराज छगन भुजबळांचा राष्ट्रवादी अन् महायुतीला पहिला झटका; घेतला 'हा' मोठा निर्णय

Mahayuti Government Cabinet Expansion : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना डावलण्यात आल्याने ते नाराज आहेच. त्यांची नाराजी आता लपून राहिलेली नाही.
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : महाराष्ट्र तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे फायरब्रँड नेते छगन भुजबळ यांना महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात डावलण्यात आले आहे. यानंतर भुजबळांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. ते मोठं पाऊल उचण्याची शक्यतादेखील वर्तविण्यात येत आहे. त्याआधी भुजबळांनी महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पहिला झटका दिला आहे.

माजी मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी (ता.16) नागपूरला हिवाळी अधिवेशनाला जाणार नसल्याचा मोठा निर्णय घेतला आहे. तसेच नाराज छगन भुजबळ यांनी त्यांच्या समर्थकांचा नाशिकमध्ये बुधवारी (ता. 18 डिसेंबर) सकाळी मेळावा बोलावला आहे. या मेळाव्यासाठी राज्यभरातील समता परिषदेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहण्याची शक्यता आहेत. या मेळाव्यात ते मोठा निर्णय जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Chhagan Bhujbal
Devendra Fadnavis on Mungantiwar : मुनगंटीवार नाराज असल्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांचं सूचक विधान, म्हणाले...

भुजबळ नेमकं काय म्हणाले..?

छगन भुजबळ यांनी आपण मंगळवारी (ता.17) येवला-लासलगाव येथे जाणार असून तेथे आपल्या कार्यकर्ते, पदाधिकारी,लोकांशी चर्चा करणार आहे. त्यानंतर समता परिषदेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. यानंतर पुढील राजकीय दिशा आपण ठरवणार आहोत, असेही ते म्हणाले. याचवेळी त्यांनी नागपूर येथे सुरु असलेल्या अधिवेशनाला जाणार नसल्याचं सांगितलं.

महायुती (Mahayuti) सरकारच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना डावलण्यात आल्याने ते नाराज आहेच. त्यांची नाराजी आता लपून राहिलेली नाही. छगन भुजबळ म्हणाले,मनोज जरांगे यांना अंगावर घेतलं, त्याचं बक्षीस मिळालं, तसेच मंत्रिपद कितीवेळा आलं आणि कितीवेळा गेलं,तरी भुजबळ संपला नाही, असं रोखठोक प्रतिक्रियाही त्यांनी दिली. तसेच मी सामन्य कार्यकर्ता आहे, मला डावललं काय आणि फेकलं काय, काय फरक पडतो,असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.

Chhagan Bhujbal
Chandrashekhar Bawankule : भाजपच्या बावनकुळेंची मोठी कबुली; म्हणाले, ...माझ्याकडून चूक झाली!

ज्यांनी मला मंत्रीपद दिले नाही, त्यांना विचारा की,का दिले नाही? मी नाराजच आहे.मी अजित पवार यांच्याशी चर्चा केलेली नाही. मला त्याची गरज वाटली नाही". लाडकी बहीण आणि ओबीसींमुळे महायुतीला यश मिळाल्याचेही भुजबळ यांनी यावेळी आठवण करून दिली.

महायुती सरकारमधील मंत्रिपदाबाबत आपल्या नावाची चर्चा होती. मात्र,ऐनवेळी माझं नाव का काढण्यात आलं,हे मला माहीत नाही. याचवेळी त्यांनी राज्यसभेची ऑफरही धुडकावली. ते म्हणाले, 7-8 दिवसांपूर्वी मला राज्यसभेवर पाठवण्याचं प्रपोजल पक्षाकडून देण्यात आलं होतं. पण मी हा प्रस्ताव नाकारला. कारण मला राज्यसभेवर जायचं नाही असं स्पष्टपणे ठणकावलं.

त्यापाठीमागचं कारणही त्यांनी सांगितलं.भुजबळ म्हणाले,मागच्यावेळी मी म्हणालो होतो.तेव्हा ते ठिक होतं. पण त्यावेळी मला तुम्ही लढलं पाहिजे,तुम्ही लढलं नाही तर कसं होणार असं सांगण्यात आलं. त्यामुळे मी लढण्यास तयार झालो. मी आताच निवडून आल्याने लगेच राज्यसभेवर जाणं योग्य ठरणार नाही. कारण मी आता राजीनामा दिला तर माझ्या मतदारांशी तो विश्वासघात ठरेल. माझे मतदार रागावणार नाहीत. पण त्यांच्याशी मी प्रतारणा करू शकत नाही, असं छगन भुजबळ यांनी ठणकावलं.

छगन भुजबळ यांनी पुढील काही दिवसांत आपण मोठा निर्णय घेणार असल्याचे संकेतही यावेळी दिले. त्यांनी जहां नहीं चैना, वहां नहीं रहना… असं सूचक विधान केलं आहे. भुजबळ यांच्या या विधानाचे अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com