Nagpur News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर चारच दिवसात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलनीकरणावरही उलटसुलट चर्चा आणि दावे प्रतिदावे केले जात आहे. यावर काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनीसुद्धा खुपकाही शिजत असल्याची शंका व्यक्त केली. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नये याचा कट कुठेतरी शिजला, यातूनच हा वाद उफाळून आल्याचे त्यांनी सांगितले.
मुळात अजित दादा गेल्यानंतर सुनेत्रा पवार यांना शपथ देण्याची एवढी घाई का केली हाच शंकेचा विषय आहे. कुठल्याच भारतीयांना हा निर्णय पटला नाही. हिंदू संस्कृतीत दशक्रिया आटोपल्याशिवाय काही केले जात नाही. कदाचित भाजपच्या दबावात त्यांनी हा निर्णय घेतला असावा. भाजपला विलीनीकरण नकोच आहे.
दादासांसोबत राहून भाजपसोबत वाटाघाटी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या दोन बड्या नेत्यांनासुद्धा एकत्रीकरण नको आहे. त्यामुळे घाईघाईत शपथविधी आटोपला असल्याचे दिसून येते. आता अजित दादाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे भवितव्य काय हे विधात्यालाच ठावूक. त्यावर भाष्य आत्ताच करणे योग्य नाही. मात्र दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी अजित दादा तयार होते.
शरद पवार यांच्यासोबत त्यांची बैठक झाली होती. ती राष्ट्रवादी काँग्रेसची अंतर्गत बाब आहे. ते प्रत्येक गोष्ट भाजपला किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगून करणार नाही. विलीनीकरण करायचे की ही हेसुद्धा भाजपला विचारावे लागणार आहे का असा सवाल करीत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरही टीका केली.
अजित पवार यांचा अपघात झाला की घातपात हे आत्ताच सांगणे अवघड आहे. मात्र काही शंका आहेत. सोशल मीडियावरून त्या व्यक्त होत आहे. अंशी टक्के लोक घातपात असल्याचे सांगत आहे. सुरुवातीला विमानात सहाजण होत असे सांगण्यात येत होते. मात्र पाच जणांचे मृतदेह सापडले. वेळेवर पायलट बदलला. असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे. एकूणच दाल मे कुछ काला है असेही वडेट्टीवार म्हणाले
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.