Raj Thackeray speech today : मुंबईतील महापौर पदाची निवड लवकरच होणार आहे. त्यापूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुंबईतील महापौर पदाबाबत महायुतीमध्ये चर्चा सुरु असून भाजप व शिवसेनेने सोमवारी गटनेत्याची निवड केली आहे. त्यातच सोमवारी दुपारी मनसेच्या नगरसेवकांची पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थित बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रसार माध्यमाशी बोलताना भाजपला पाठिंबा देण्याच्या बाबतीत मोठे विधान केले.
सोमवारी पार पडलेल्या मनसे नेत्याच्या बैठकीस राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीत विविध महत्वपूर्ण विषयावर चर्चा पार पडली. या बैठकीनंतर प्रसार माध्यमाशी बोलताना राज ठाकरे म्हणाले, ' मुंबई महापालिकेत भाजपसोबत जाणार नाही. त्याबाबत या बैठकीत कसलीच चर्चा झालेली नाही. मुंबई महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपला पाठींबा देणार नाही.'
मुंबई महापौर पदाच्या निवडणुकीत मनसे भाजपला (BJP) पाठींबा देणार अशा चर्चा रंगल्या होत्या. मनसेचे मुंबई महापालिकेत सात नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे ते कॊणत्या पक्षाला पाठींबा देणार याची उत्सुकता लागली होती. मात्र, या बैठकीनंतर राज ठाकरे यांनीच भाजपला पाठींबा देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
दुसरीकडे या बैठकीनंतर प्रसार माध्यमाशी बोलताना मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी देखील मुंबई महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपसोबत जाणार नसल्याचे स्पष्ट केले. बैठकीत त्याबाबत कसलीच चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट करीत प्रसार माध्यमात सुरु असलेल्या चर्चाना पूर्णविराम दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.