Congress leader Vijay Wadettiwar targets BJP  Sarkarnama
विदर्भ

Vijay Wadettiwar : निकालाची वाट कसली बघता.... गुलाल उधळायला सुरुवात करा : विजय वडेट्टीवारांचा भाजपला टोला

BJP Criticism : नगरपालिका व महापालिका निवडणुकांमध्ये भाजप पैशांचा वापर करत असल्याचा आरोप करत विजय वडेट्टीवारांनी निकाल आधीच ठरले असल्याची टीका केली आणि भाजपला उपरोधिक टोला लगावला.

Rajesh Charpe

Maharashtra Local Elections : नगरपरिषद आणि त्यानंतर होणाऱ्या महानगरपालिका निवडणूक आणि निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पैसे वाटप आणि निवडणूक आयोगाला हाताशी धरून या निवडणूक होणार आहे. हे बघता स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निकाल जवळपास फिक्स आहे अशी टीका करून भाजपने आत्तापासूनच गुलाल उधळावा असा उपरोधिक टोला काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी लागावला.

नगरपालिका निवडणुकीदरम्यान अनेक ठिकाणी पैशाचे आमिषे दाखवण्यात आली. मतदारांना पाकिटे वाटण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथे 5 हजार रुपयांची पाकिटे वाटण्यात आली आहेत. कुंभमेळा असल्याने त्र्यंबकेश्वर पालिका भाजपला कुठल्याही परिस्थिती त्यांच्या ताब्यात हवी आहे. याकरिता एक मतदानाचा रेट 50 हजार रुपये ठेवण्यात आला होता असा खळबळजनक आरोपही वडेट्टीवारांनी केला.

हे सर्व होत असताना राज्य निवडणूक आयोगाने झोपेचे सोंग घेतले आहे. आयोग भाजपची बी टीम म्हणून काम करीत असल्याचा दावाही वडेट्टीवार यांनी केला. निवडणुकीपूर्वीच आम्ही 51 टक्के मते घेऊन जिंकू असे दावे भाजप (BJP) नेत्यांमार्फत केले जात आहेत. ते सर्व पैसे आणि बोगस मतदानाच्या जोरावर केले जात आहेत.

विधानसभेच्या निवडणुकीतच मतदार यादीत घोळ असल्याचे समोर आले आहे. वारंवार त्यात सुधारणा करण्याची मागणी आम्ही केली होती. त्यानंतरही तीच यादी कायम ठेवण्यात आली. उलट आणखीच घोळ घालण्यात आला. त्यात महापालिकेच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. सदोष मतदार याद्या कायम ठेवून महापालिकेसाठी मतदान घेण्यात येणार आहे.

हे बघता भाजपने निकालाची वाट न बघता गुलाल उधळावा असा टोलाही विजय वडेट्टीवार यांनी लगावला. विधानसभेची निवडणूक भाजपने मतचोरी करून जिंकली असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी मतदार याद्यांमधील घोळ बाहेर काढला होता. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनीसुद्धा त्यांच्या त्यांचा विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांची पडताळणी केली. त्यातही अनेक नावे बोगस आढळली आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT