Epstein Files : मोदी ऑन बोर्ड! भारताच्या पंतप्रधानांचं एपस्टीन फाईलमध्ये नाव? पृथ्वीराज चव्हाणांकडून एका मेलमधील 3 शब्दांचा संदर्भ

Prithviraj Chavan Statement : एपस्टीन फाईल्समध्ये भारतीय नेत्यांची नावे असल्याच्या दाव्यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संबंध स्पष्ट करण्याची मागणी केली आहे.
Epstein-Narendra Modi
Epstein-Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on
  1. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एपस्टीन फाईलमधील ईमेलचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जेफ्री एपस्टीन यांच्या संबंधांबाबत स्पष्टीकरणाची मागणी केली आहे.

  2. एपस्टीन फाईलमध्ये अनिल अंबानी, केंद्रीय मंत्री हरदीप पुरी तसेच काही आजी-माजी खासदारांची नावे असल्याचा दावा चव्हाण यांनी केला आहे.

  3. या फाईलमधून भारताच्या राजकारणावर गंभीर परिणाम होऊ शकतात आणि पुरावे समोर आल्यास गुन्हे दाखल होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

Karad, 20 December : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराने एपस्टीनला विनंती केली होती की, मला नरेंद्र मोदींना भेटायचे आहे. त्यानंतर एपस्टिन मी प्रयत्न करतोय असे सांगतो आणि काही दिवसांनी मोदी ऑन बोर्ड असा मेल येतो. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एपस्टिन याचे नाते काय, याचे उत्तर मिळाले पाहिजे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज कऱ्हाड (जि. सातारा) येथे माध्यमांशी बोलताना केली. दरम्यान, एपस्टिन फाईलमध्ये भारतातील उद्योगपती अनिल अंबानी, पेट्रोलियम मंत्री हार्दिक पुरी आणि काही आजी-माजी खासदारांच्या नावाचा समावेश आहे, असेही चव्हाण यांनी पहिल्यांदाच स्पष्टपणे सांगितले.

अमेरिकेत बाल लैगिंक स्कॅण्डलचा गुन्हा १९९५-९६ पासुन सुरु आहे. त्या घटनेचा जेफ्री एपस्टीन हा धनाढ्य उद्योगपती सूत्रधार होता. त्याची २०१९ मध्ये आत्महत्या की खून झाला, हे स्पष्ट झालेले नाही. त्याने लहान मुलींची देहविक्री बड्या उच्चपदस्थ धेंड्यांना केली, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले.

अमेरिकेतील (America) संसेदत दोन्ही पक्षाच्या खासदारांनी एपस्टिन फाईल खुल्या करण्याचा कायदा पास केला आहे. सध्या या फाईलची कागदपत्रे अमेरिकेच्या कायदा मंत्र्यांच्या ताब्यात आहेत. त्या फाईलमधील डाटा ३०० जीबीपेक्षाही जास्त डाटा आहे. त्या फाईलमधील सर्व माहिती खुली होण्यास अजूनही काही आठवडे लागणार आहेत. त्या फाईलमध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे अनेक फोटो, व्हीडीओ आहेत. त्यामुळे ते फोटो दाबण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे.

अमेरिकेत भारतीय वंशाचे रो खन्ना नावाचे खासदार असून त्यांनी हे विधेयक मांडले आहे. त्यांनी अमेरिकन सरकारकडून माहिती लपवण्याचा प्रकार होत असल्याचा आरोप केला आहे. या फाईलमध्ये भारतातील उद्योगपती अनिल अंबानी, पेट्रोलियम मंत्री हार्दिप पुरी, तसेच आजी-माजी खासदार यांच्या नावाचा समावेश आहे.

Epstein-Narendra Modi
Deshmukh News : दोन्ही देशमुखांना पुन्हा डावलले; फडणवीसांच्या लाडक्या नेत्यांकडे निवडणुकीची सूत्रे

एका ईमेलमध्ये अमेरिकेतील ट्रम्प यांचा स्टील बॅरन नावाचा सल्लागार होता. तो एपस्टीनना मला भारताच्या पंतप्रधानांना भेटायचे आहे, अशी विनंती करतो. एपस्टीनकडून काही दिवसांनी मी प्रयत्न करतोय, तुमची भेट होईल का, असे उत्तर येते. काही दिवसांनी पुन्हा मोदी ऑन बोर्ड असा मेल येतो. त्यामुळे मोदी आणि एपस्टीनचे काय नाते आहे? की एपस्टीन मोदींची कोणाशीही भेट घडवू शकतो, याचे उत्तर सरकारने द्यावे.

तसेच, माजी खासदार उद्योगपती अनिल अंबानी यांचेही नाव त्यात आहे. अमेरिकेत राहणारे भारतीय वंशाचे एकजण आहेत, त्यांचेही नाव त्यात आहे. अजूनही सर्व फोटो, फाईल समोर आलेल्या नाहीत. जगातील सर्व पत्रकार ही माहिती शोधत आहेत.

भारताच्या राजकारणावर परिणामाची शंका

एपस्टीन फाईलमधून जी माहिती समोर येईल, त्यातून भारताच्या राजकारणावर परिणाम होईल, अशी मला शंका आहे असे सांगून चव्हाण म्हणाले, एपस्टीन फाईल कायद्यानुसार काही माहिती समोर येत आहे. जर बाल लैंगिक शोषण झाले आहे, असा पुरावा समोर आले तर अमेरिका आणि भारतातही गुन्हा दाखल होऊ शकतो. हे प्रकरण गंभीर आहे. ज्याच्याबद्दल पुरावे सापडले आहेत, तो काहीतरी कारणे देऊन ते मान्य करणार नाहीत. जनतेच्या न्यायालयात ही सर्व माहिती खुली होईल. अशा लोकांच्यावर सरकार चालवण्याची सूत्रे ठेवायची की नाही याचा भारताच्या जनतेला विचार करावा लागेल.

Epstein-Narendra Modi
Bogus Voter : अंबरनाथमध्ये मतदाना दिवशीच राजकीय भडका! बोगस मतदार, EVM मध्ये छेडछाड अन् पोलिसांचा लाठीचार्ज

मोदी-एपस्टीनची गाठ कोणी घालून दिली?

एपस्टीन आणि मोदी यांचे संबंध कसे आले असा प्रश्न उपस्तित करुन चव्हाण म्हणाले, अमेरिकेमध्ये २००८-०९ मध्ये एपस्टीनला शिक्षा झाली. हा गुन्हेगार आहे, देहव्यापार करतो, हे सर्वांना माहिती होते. मोदींचा २०१४ मधील संदर्भ त्या फाईलमध्ये आहे. त्यामुळे मोदींचा आणि एपस्टीनची गाठ कोणी घालून दिली. हार्दिप पुरी हे अमेरिकेमध्ये भारताचे राजदूत होते. त्यांचेही नाव या फाईलमध्ये आलेले आहे. त्यांची भूमिका यात काय आहे का? हेही शोधावे लागणार आहे.

1) प्रश्न: पृथ्वीराज चव्हाण यांनी नेमकी काय मागणी केली आहे?
उत्तर: नरेंद्र मोदी आणि जेफ्री एपस्टीन यांच्यातील संबंधांबाबत सरकारने स्पष्ट उत्तर द्यावे, अशी मागणी केली आहे.

2) प्रश्न: एपस्टीन फाईलमध्ये भारतातील कोणाची नावे असल्याचा दावा आहे?
उत्तर: अनिल अंबानी, केंद्रीय मंत्री हरदीप पुरी आणि काही आजी-माजी खासदारांची नावे असल्याचा दावा करण्यात आला आहे.

3) प्रश्न: एपस्टीन फाईलमधील माहिती किती मोठी आहे?
उत्तर: या फाईलमधील डेटा ३०० जीबीपेक्षा अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे.

4) प्रश्न: या प्रकरणाचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो?
उत्तर: माहिती उघड झाल्यास भारताच्या राजकारणावर परिणाम होऊन कायदेशीर कारवाईची शक्यता निर्माण होऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com