Vijay Wadettiwar Sarkarnama
विदर्भ

Vijay Wadettiwar : सत्ताधारी आमदारच कायदा हातात घेत असतील तर काय बोलणार?

Congress on BJP : विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची टीका

Atul Mehere

Nagpur : राज्यात सत्ताधारी आमदार पोलिस स्टेशनमध्ये कायदा हातात घेत असतील तर राज्यातील जनतेने कोणाकडे बघायचे. सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्र खड्ड्यात घातला आहे, अशी परिस्थिती सध्या राज्यात आहे. त्यामुळे सरकारने तातडीने सत्ता सोडावी, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

पोलिसाच्या केबिनमध्ये जाऊन गोळीबार करणारा व्यक्ती सराईत गुंड असतो. महायुतीच्या सत्ताकाळात सत्य त्रस्त झाले आहे. दादागिरी वाढत चालली आहे. कोकणातील एक आमदार तर दादागिरी करणाराच आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

महाराष्ट्रातील एकूण वातावरण अत्यंत घातक होत आहे. भविष्यातही घात होईल. महायुतीच्या तीही पक्षात ‘कोल्डवॉर’ सुरू आहे. निवडणूक जवळ येतील तसतसे मारामारी, गोळीबार हे सगळे बघायला मिळेल. गुन्हेगारीत अनेक भूमाफिया आहेत. भ्रष्टाचाराचे प्रकार वाढले आहेत. अशा प्रकरणातून जमिन हडपल्याची अनेक उदाहरणे देता येईल. अशा पद्धतीने पैसे कमविण्याचे काम हे सरकारमध्ये सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात अशा घटना होणे. चुकीचे असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. पुढच्या काळात काय होईल, याचा अंदाज महाराष्ट्रातील जनतेने घ्यावा, असेही ते म्हणाले.

सगळीकडे गुंड पोसत महाराष्ट्रातील राजकारण सुरू आहे. महिलांसंदर्भात सत्ताधाऱ्यांची विकृती नेहमीच दिसून आली आहे. महिला मल्लांचे शोषण झाले. त्यावेळेस खासदारांना पाठिशी घालण्यात आले. सत्ताधाऱ्यांमध्ये ही वृत्ती दिसून आली आहे. एखाद्याला लाज वाटेल, अशी ही प्रवृत्ती आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आंबेडकर इंडिया आघाडीबद्दल बोलताना आम्ही महाविकास आघाडी सोबत आहोत असे नमूद केले आहे. यातून ‘पॉझिटिव्ह’ बघण्याची गरज आहे. बैठकीत चर्चा झाली. चर्चेची एक फेरी संपली. दुसरी फेरी सुरू होईल. चार पक्ष एकत्र येऊन आघाडी करतात तेव्हा चर्चा बराच वेळ चालत असते. एकाच बैठकीत सर्व काही संपत नाही. विदर्भातील जागे संदर्भात सध्या फक्त प्राथमिक चर्चा झाली आहे. अंतिम निर्णय झालेला नाही. चर्चेमध्ये अनेक गोष्टी पुढे आल्या आहेत, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

ओबीसीच्या मुद्द्यावर छगन भुजबळ यांनी जे आंदोलन सुरू केले त्या सभेला आपण जाणार होतो. मतदारसंघातील पूर्व नियोजित कार्यक्रम असल्याने सभेला जाऊ शकलो नाही. पुढच्या सभेला नक्की जाणार आहे. ओबीसीच्या लढ्यात आपण भुजबळांसोबत आहोत. ओबीसींची शक्तीस्थळं आहेत. त्या ठिकाणी यात्रेची सुरुवात करणार आहे. ओबीसींच्या लढ्यासाठी सगळे सोबत आहेत. मुख्यमंत्र्यांनी जे परिपत्रक काढले, ते मराठा समाजाला बुडविणारे आणि ओबीसीचे नुकसान करणारे आहे, असेही ते म्हणाले.

Edited By : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT