Vijay Wadettiwar News : सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर वडेट्टीवार जाणार सरकारी बंगल्यात!

Vijay Wadettiwar Allot Government Bunglow : मंत्रालयासमोरील बंगल्यात असणार वडेट्टीवारांचा थाट...
Vijay Wadettiwar News :
Vijay Wadettiwar News :Sarkarnama
Published on
Updated on

जुई जाधव -

Mumbai News : काँग्रेसचा आक्रमक चेहरा असलेले विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना अखेर त्यांचा शासकीय बंगला बहाल करण्यात आला आहे. विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर तब्बल सहा महिन्यांनी त्यांना निवासासाठी आता बंगला देण्यात आला आहे. मंत्रालयासमोरच असलेल्या प्रचीतगड हा बंगला वडेट्टीवार यांना मिळाला आहे. यामुळे शासकीय निवासासाठीची त्यांची दीर्घ प्रतीक्षा अखेर संपली आहे. (Latest

Vijay Wadettiwar News :
Jitendra Awhad on Lord Ram : राम मांसाहारी असल्याबाबत माझ्याकडे पुरावे; आव्हाडांनी दिला रामायणाचा दाखला..

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करीत आपल्या समर्थक आमदारांसह सरकारमध्ये सामील झाल्यानंतर, काँग्रेस पक्षातून विजय वडेट्टीवार यांच्या नावाची वर्णी विरोधी पक्षनेतेपदासाठी लागली होती. त्यानुसार विरोधी पक्षनेत्यांना सरकारी बंगला निवासासाठी देण्यात येतो. मात्र वडेट्टीवार यांनी सहा महिन्यांनंतरही बंगला देण्यात आला नव्हता. मात्र सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर त्यांना बंगला मिळाला आहे. मंत्रालयासमोरीलच प्रचीतगड हा बंगला आता विरोधी पक्षनेत्याचा बंगला झाला आहे.

Vijay Wadettiwar News :
Ncp News : राष्ट्रवादीची धडधड वाढणार; अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिले मोठे संकेत

विजय वडेट्टीवार यांना बंगला दिला गेला नव्हता, त्यावेळी सर्व बैठक आणि पत्रकार परिषद ते विधानभवन इथे त्यांच्या कार्यालयात घ्यायचे. महाविकास आघाडी मध्ये ज्यावेळी अजित पवार हे विरोधी पक्षनेता होते त्यावेळेला त्यांना देवगिरी हा बंगला देण्यात आला होता आणि तशी मागणी त्यांनी पत्राद्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनादेखील केली होती. शासकीय पदावर जे नेते असतात त्यांना बंगला देण्यात येतो, मात्र विजय वडेट्टीवार यांना तब्बल सहा महिन्यांनी हा बंगला देण्यात आला आहे.

जून महिन्यात अजित पवार यांनी महायुतीसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर काहीच दिवसांनी त्यांना शासकीय निवासस्थान देण्यात आले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात बाळासाहेब पाटील यांचा बंगला होता. महायुती सरकार आल्यावर कोणत्याही मंत्र्याला हा बंगला दिला नव्हता. अजित पवार गट मंत्रिमंडळात सहभागी झाल्यावर धनंजय मुंडे यांना बंगला दिला होता, पण त्यांनी बंगला बदलून घेतला. त्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना बंगला मिळाला आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com