Nagpur News : काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी हर्षवर्धन सपकाळ यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. दिग्गज नेत्यांना डावलल्या जात असल्याचेही बोलले जात आहे. यावर राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्रात आणि राज्यात आता काँग्रेसची सत्ता नाही, ती येण्याची शक्यतासुद्धा वाटत नसल्याने प्रदेशाध्यक्षपद घेण्यास कोणी तयार नसल्याचा टोला काँग्रेसला लगावला.
काँग्रेसमध्ये (Congress) प्रदेशाध्यक्ष सर्वोच्च असते. यापूर्वी प्रदेशाध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये प्रचंड स्पर्धा असायची. दिल्लीपर्यंत लॉबिंग केले जात होते. महाविकास आघाडीची राज्यात असताना नाना पटोले यांना हटवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. दिल्लीपर्यंत तक्रारी केल्या होत्या. अनेकांनी आपली नावे पुढे रेटली होती.
लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने महाराष्ट्रात मोठी मुसंडी मारली होती. त्यामुळे अनेकांना प्रदेशाध्यक्ष व्हायचे होते. मात्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सर्वच बदलले आहे. दिल्लज नेत्यांना आता प्रदेशाध्यक्ष व्हायचे नाही. दावे करणारेही समोर येऊन जबाबदारी स्वीकारण्यास तयार नाही. अमित देशमुख (Amit Deshmukh), सतेज पाटील, विश्वजित कदम यांची नावे काही दिवसांपूर्वी आघाडीवर होती. मात्र त्यांनीच नकार दिला असल्याचे समजते.
या सर्व पार्श्वभूमीवर हर्षवर्धन सपकाळ यांचे नाव पुढे केले जात असल्याची चर्चा आहे. याबाबत विचारणा केली असता विखे पाटील म्हणाले, दिग्गजांना डावलून संधी दिली हे म्हणणं योग्य नाही. कारण दिग्गजच पळून गेले आहेत. सत्ता होती म्हणून काँग्रेसमध्ये लोक होते. आता काँग्रेसची सत्ता नाही आणि येण्याची शक्यता नाही. एवढी निच्चांक काँग्रेसने कधी गाठला नव्हती. प्रत्येक जण एक दुसऱ्यांकडे बोट दाखवत आहेत. प्रदेशाध्यक्षपद कोणी घ्यायला तयार नाही. हर्षवर्धन माझा चांगला मित्र आहे. त्याला संधी मिळाली तर चांगली गोष्ट आहे. मात्र, दिग्गजांना डावलून त्यांना संधी दिली हे म्हणणे योग्य नाही.
उद्धव सेनेच्या नेत्यांवर संन्यास घेण्याची वेळ
माजी आमदार राजन साळवी यांनी उद्धव सेनेला जय महाराष्ट्र करून शिंदे सेनेत प्रवेश केला. राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा जोरात सुरू आहे. यावरही विखे पाटील म्हणाले, कोण कुठे, कुठल्या पक्षात जात आहे, याबाबत मला जास्त माहिती नाही. मात्र उद्धव ठाकरे सेनेत असलेल्या नेत्यांना संन्यास घेतल्याशिवाय दुसरा मार्ग राहिला नाही. त्यामुळे ते पर्याय शोधत असल्याचेही विखे पाटील म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.