
Mumbai News : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार विजय मिळवला. महायुतीनं राज्यात तब्बल 232 जागा जिंकल्या. महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का बसला. त्यानंतर महाविकास आघाडीमधील अनेक नेते हे आता शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. याचा सर्वात मोठा फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला. आतापर्यंत शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकारी आणि नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी हे शिवसेनेत उद्या दुपारी तीन वाजता शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यापूर्वीच मिरा भाईंदरमधून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या तीन माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) आणि माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्या नेतृत्वाखाली मिरा भाईंदरमधील तीन माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. माजी नगरसेविका शर्मिला बगाजी, माजी नगरसेवक बर्नड डिमेलो आणि माजी नगरसेवक जार्जी गोविंद यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले आहे.
तीन नगरसेवक शिंदे सेनेत गेल्याने उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. राज्यात पुढील काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात असे संकेत मिळत आहेत, मात्र त्यापूर्वीच या माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.