MLC Election  Sarkarnama
विदर्भ

Graduate Constituency Election : शिक्षक-पदवीधरसाठीचं मतदान संपलं! शेवटच्या तासात अनेकांची मतदानासाठी गर्दी

MLC Election : विधान परिषदेच्या एकूण पाच जागांसाठी आज मतदान पार पडलं

सरकारनामा ब्यूरो

Teacher and Graduate Constituency Election : विधान परिषदेच्या एकूण पाच जागांसाठी आज मतदान पार पडलं. सकाळी 8 वाजता सुरु झालेली मतदानाची प्रक्रिया सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरु होती.

यामध्ये अमरावती, कोकण, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, जिल्ह्यांत मतदान पार पडलं आहे. यामध्ये नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघाची निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं.

यामध्ये गडचिरोली वगळता उर्वरित जिल्ह्यात दुपारी 4 पर्यंत मतदानाची वेळ देण्यात आली होती. मात्र, अनेक शिक्षकांनी साडेतीननंतर मतदान केंद्र गाठले, तर काही लेट लतिफ शिक्षक चार वाजल्यानंही मतदान केंद्रावर पोहोचले.

ही निवडणूक बॅलेटनुसार घेण्यात आली. तसेच पसंती क्रमांकानुसार मतदान करण्याची पद्धत असल्याने नेहमीप्रमाणे प्रत्येक मतदाराला इतर निवडणुकींच्या तुलनेत जास्त वेळ लागत होता. त्यामुळे दुपारी चार नंतरही विभागातील अनेक मतदान केंद्रांवर मतदानासाठी रांगा लागल्या होत्या.

नागपूर विभागाअंतर्गत नागपूरसह गडचिरोली, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यातील 39 हजारांवर शिक्षक मतदार आहे. तर 22 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निवडणूक आयोगाने दुपारी दोन पर्यंत जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 60.48 टक्के मतदान झाले होते.

तसेच दुपारी 4 वाजेपर्यंत मतदानाची वेळ असल्याने अनेक शिक्षक तीन वाजल्यानंतर केंद्रांवर दाखल झाले. तसेच काही लेटलतिफांनी चार नंतरही मतदान केंद्र गाठले. मात्र, 4 वाजेनंतर आलेल्या अनेकांना मतदानाची संधी देण्यात आली नाही. तर नागपुरातील नागसेन विद्यालयात मतदानासाठी दुपारी 4 वाजताची वेळ संपल्यानतरही 250 ते 300 मतदार रांगेत उभे होते.

दरम्यान, विधान परिषदेच्या एकूण पाच जागांसाठी आज राज्यात मतदान पार पडलं. यावेळी प्रत्येक मतदान केंद्रांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. तर नागपूर विभागामध्ये एकूण 22 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. तसेच अमरावती पदवीधर मतदार संघामध्ये देखील सुरळीत मतदान प्रक्रिया पार पडली.

अमरावती (Amravati) शहरातही मतदारांची मतदानासाठी शेवटच्या तासात गर्दी दिसून आली. अमरावती विभागात दुपारी 2 वाजेपर्यंत 30.40 टक्के झालं मतदान झाले होते. तर काही वेळातच एकूण किती टक्के मतदान झालं याची आकडेवारी समोर येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT