Wardha news : सरकारी कंत्राटदारांची थकबाकी राज्य सरकारची डोकेदुखी ठरली आहे. सांगली इथल्या एका कंत्राटदारानं यातूनच आत्महत्या केली. अशी बिल काढण्यासाठी प्रशासनाकडून वेठीस धरण्याचे प्रकार वेगळेच असतात!
अशाच प्रकार वर्धा इथं घडला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागासमोर एका सरकारी कंत्राटदाराने स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. यामुळे त्याला ताब्यात घेताना पोलिस प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.
सरकारी (Government) कंत्राटदार बाबा जाकीर यांचे दोन वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे बिल थकले आहे. हे बिल मिळावं यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू होता. पण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता. याबाबत सरकारी कंत्राटदारांच्यावतीनं कार्यकारी अभियंता यांना निवेदन देखील देण्यात आले. पण प्रतिसाद मिळाला नाही.
यावर बाबा जाकीर यांनी स्वातंत्र्यदिनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. तसा त्यांनी आज कार्यालयासमोर येत अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत, आत्मदहनाचा प्रयत्न केला. यामुळे एकच खळबळ उडाली. परंतु पोलिसांनी प्रसंगावधान राखत, बाबा जाकीर यांना ताब्यात घेतलं. यावेळी बाबा जाकीर यांनी कार्यकारी अभियंता यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते वर्धा इथं पीएम विश्वकर्मा योजनेचा प्रारंभ झाला. या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात सरकारकडून कामे करण्यात आली. या कामांचा निधीही जिल्हाला प्राप्त झाला. मात्र कार्यकारी अभियंता अंभोरे यांनी बिल काढण्यासाठी पैशाची मागणी केली.
पैसे न दिल्याने बिल थांबवून ठेवले आहे. याबाबत वारंवार कंत्राटदाराकडून निवेदन देण्यात आले. मात्र कार्यकरी अभियंता बिल देत नसल्याने कंत्राटदार संतप्त झाले आहे. यासह सरकारकडून विविध विभागाचे बिल सुद्धा थकित आहे. यामुळे कंत्राटदार आता टोकाचे पाऊल उचलत आहे.
वर्धा जिल्ह्यात विविध विभागाचे कोट्यवधीचे बिल दोन वर्षांपासून दिली गेलेली नाही. यामुळे कंत्राटदार अडचणीत आला आहे. ही थकित बिल मिळावी, याची मागणी आहे. कंत्राटदार देयक मिळावे म्हणून, मागणी करत आहे. मात्र सरकार व अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहे. या दुर्लक्षित पणामुळे आता कंत्राटदार टोकाचे पाऊल उचलत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.