Tribal Birhad Morcha: बिऱ्हाड मोर्चाची व्याप्ती वाढणार, उद्यापासून आंदोलनात उतरण्याची आदिवासी संघटनांची घोषणा!

Tribal Politics; Trible Department firm on Contract Teacher recruitment, Trible representative Under pressure-बिऱ्हाड मोर्चाला ३७ दिवस पूर्ण, राज्य सरकार कंत्राटी शिक्षक नेमणुकीविषयी ठाम असल्याने आंदोलक संतप्त
Trible Birhad Agitation
Trible Birhad AgitationSarkarnama
Published on
Updated on

Nashik Tribal News: राज्यभरातील आदिवासी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा नाशिक येथे ३६ दिवसांपासून बिऱ्हाड मोर्चा सुरू आहे. मात्र राज्य शासन कंत्राटी पद्धतीने कर्मचारी नेमणूकीवर ठाम आहे. त्यामुळे सत्ताधारी आदिवासी लोकप्रतिनिधींची चांगलीच कोंडी झाली आहे.

आज आदिवासी विकास महामंडळाच्या कार्यालयाच्या आवारात झालेल्या स्वातंत्र्यदिनाच्या समारंभावर देखील आदिवासी बिऱ्हाड मोर्चाचे सावट होते. ३७ दिवस होऊनही राज्य सरकार मागण्यांचा विचार करायला तयार नाही. त्यामुळे आंदोलकांचे मनोबल तोडण्याचा राज्य शासनाचा उद्देश आहे.

यासंदर्भात अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ या आंदोलकांची भेट घेऊन मध्यस्थीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला होता. आता विविध आदिवासी संघटना एकत्र आल्या आहेत. या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिक शहरात बैठक झाली. त्यांनी या आंदोलनाला पाठींबा देत त्यात सक्रीय सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचे आंदोलकांचे समन्वयक प्रा. तुळशीराम खोटरे यांनी सांगितले.

Trible Birhad Agitation
Sanjay Raut Sangamner : 'महाराष्ट्रात बदलाची प्रक्रिया, 'मविआ'चे सरकार येणार'; खासदार राऊतांनी थोरातांविषयी बोलून दाखवली 'ती' खंत

या आंदोलनात आदिवासींचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या जयेश युवा फाऊंडेशन, सावण फाऊंडेशन, आदिवासी बचाव समिती, आदिवासी पँथर संघटना, महात्मा रावण फाऊंडेशन, बिरसा फाऊंडेशन, उलगुलान संघटना, आदिवासी विकास संघटना यांसह विविध संघटना आंदोलनात सक्रीय सहभागी होणार आहेत.

राज्यातील आदिवासी आश्रम शाळांमध्ये एक हजार ९१७ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहे. ते दहा ते बारा वर्षे कार्यरत आहेत. मात्र या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने अचानक सेवामुक्त करण्याचा निर्णय घेतला. राज्य शासनाने महाराष्ट्र विकास ग्रुप आणि छत्रपती शिवाजी महाराज मल्टी सर्विसेस कंपनी या दोन संस्थांना ८५ कोटी रुपये खर्च करून खाजगी मार्गाने भरती करण्याचे आदेश दिले आहेत.

दहा ते बारा वर्ष आदिवासी आश्रम शाळा आणि शाळांमध्ये हे शिक्षक व कर्मचारी काम करीत आहेत. आता अचानक त्यांना कमी करून खाजगी संस्थांमार्फत भरतीचा घाट घालण्यात आला आहे. यामागे सरकारचा हेतू काय असा गंभीर प्रश्न या आंदोलकांनी उपस्थित केला आहे. राज्यात 25 आदिवासी आमदार असून यातील बहुतांशी सत्ताधारी आहेत. मात्र त्यांचेही सरकार पुढे काही चालत नाही अशी स्थिती आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com