Santosh Deshmukh-Dhananjay Munde Sarkarnama
विदर्भ

Santosh Deshmukh Murder Case : धनंजय मुंडे यांना कोण वाचवत आहे?

Dhananjay Munde Related News : धनंजय मुंडे यांच्या जवळच्या वाल्मिक कराड यांच्या नावाचा वारंवार उल्लेख विरोधकांनी केला आहे. त्यांच्यावर राजकीय वरदहस्त आहे, असे सांगून अनेकांनी धनंजय मुंडे यांच्याकडे अंगुलीनिर्देश केला.

Rajesh Charpe

Nagpur, 20 December : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यापासून धनंजय मुंडे नागपूरमधून गायब आहेत. पहिल्या दिवशी हिवाळी अधिवेशनाला हजेरी लावल्यानंतर ते अद्याप विधानसभेत फिरकले नाहीत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीसुद्धा नाव घेऊन त्यांच्याबाबत विचारणा केली होती. आज विरोधकांनी मुंडे यांना वाचण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे सांगून विधानसभेतून ‘वॉक आऊट’ केले.

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचा अमानुषपणे खून करण्याचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. दोन दिवसांपासून विरोधक या प्रकरणावर चर्चा करीत होते. या चर्चेदरम्यान धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या जवळच्या वाल्मिक कराड यांच्या नावाचा वारंवार उल्लेख विरोधकांनी केला आहे. त्यांच्यावर राजकीय वरदहस्त आहे, असे सांगून अनेकांनी धनंजय मुंडे यांच्याकडे अंगुलीनिर्देश केला.

यासर्व आरोपांना मुख्यमंत्री काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी संपूर्ण घटनाक्रम अतिशय बारकाईने मांडला. त्यातील आरोपीचं नावे, घुले आणि देशमुख यांच्यामध्ये झालेला वादा याचीही सविस्तर माहिती दिली.

कराड यांचा सरपंच देशमुख यांच्या खुनाशी प्रत्यक्ष संबंध नाही, असे त्यांनी सांगितले. मात्र, बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी खणून काढण्यासाठी कराड व त्यांच्या साथीदारांची चौकशी केली जाईल, येथील गुन्हेगारी व खंडणीचे पाळेमुळे खणून काढली जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मात्र, राजकीय वरदहस्त आणि धनंजय मुंडे यांचा उल्लेख फडणवीस यांनी केला नाही.

फडणवीस यांच्या उत्तरावर बोलण्यास विरोधकांना अध्यक्षांनी परवानगी नाकारली. मात्र, विरोधकांनी विशेषतः काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या आमदारांनी धनंजय मुंडे यांना वाचविण्याच प्रयत्न केला जात असल्याचे सांगून सभाहगृहातून बर्हिगमन केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हेसुद्धा सभागृहात उपस्थित होते. मात्र त्यांनी या विषयावर बोलण्याचे टाळले.

अजित पवार यांनी पाच माजी मंत्र्यांना डच्चू दिला आहे, त्यात छगन भुजबळ या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे. मुंडे यांचाही पत्ता त्यांनी कट केला होता. मात्र शेवटच्या क्षणी मुंडे यांचा समावेश झाल्याचे बोलले जात आहे. भुजबळ यांच्याऐवजी मुंडे यांना अजित पवारांनी पसंती दिली, असे सांगण्यात येत आहे.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT