
Santosh Deshmukh Case : मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर बिनखात्याचे मंत्री धनंजय मुंडे हेसुद्धा नागपूरमधून गायब झाले आहेत. हिवाळी अधिवेशनाचे चारदिवस उलटून गेले तरी ते सभागृहात फिरकले नाहीत. बीड येथे झालेल्या सरपंचाच्या खुनामुळे तेथील वातावरण तापले आहे. या घटनेतील आरोपींवर एका राजकीय नेत्यांचा वरदहस्त असल्याची चर्चा आहे. याकडे लक्ष वेधून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंडे यांना मंत्रिमंडळातून वगळण्याची मागणी केली आहे.
अजित पवार यांनी मंत्रिमंडळाच्या विस्तारातून पाच मंत्र्यांना वगळले आहे. त्यामुळे ज्येष्ठ नेते भुजबळ चांगलेच नाराज झाले आहेत. ते अधिवेशन सोडून नाशिकमध्ये निघून गेले आहेत. आपल्या समर्थकांचे मेळावे घेऊन अजित पवार यांच्यावर ते तोफ डागत आहेत . यावर अजित पवार यांनी अद्याप प्रतिक्रिया दिली नाही. यात आता धनंजय मुंडे यांच्यावर होत असलेल्या आरोपांमुळे ते अडचणीत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
विशेष म्हणजे मुंडे यांचाही मंत्रिमंडाळाच्या यादीत समावेश नव्हता. मुंडे की भुजबळ असा पेच निर्माण झाला होता. शेवटच्या क्षणी मुंडे यांच्या नावाला दादांनी पसंती दिल्याची चर्चा आहे. यातच नाना पटोले यांनी मस्साजोग येथे घटलेल्या घटनेशी धनंजय मुंडे यांचे नाव जोडले आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मुंडे कुठे गायब झाले, अशी विचारणा त्यांनी विधानसभेत केली.
या घटनेत वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी आहे. त्याचे नाव घेण्याचीही हिंमत विधानसभेत घेण्याची कुठल्याचा आमदाराची हिंमत होत नाही. एवढी दहशत आपण प्रथमच बघत आहो.त वाल्मिक कराडला वाय प्लस सुरक्षा पुरवण्यात आली आहे. ती कोणी दिली, कोणी शिफारस केली अशी विचारणा नाना पटोली यांनी केली.
कराडवर एका राजकीय नेत्याचा वरदहस्त आहे. अशी कुजबूज आहे. ती खरी असेल तर मुंडे यांना मंत्रिमंडळातून वगळण्याची आमची भूमिका राहील, याचे उत्तर सरकारने देणे अपेक्षित असल्याचे नाना पटोले म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.