Santosh Deshmukh Murder Case : धनंजय मुंडेंची गेली तीन दिवसांपासून अधिवेशनाला दांडी...नेमके गेले कुठे ?

Dhananjay Munde News : धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड हे आपले जवळचे कार्यकर्ते असल्याचे मान्य केले होते. विधानसभेतही सुरेश धस यांनी वाल्मिक कराड यांच्या आडून नाव न घेता मुंडेंवर निशाणा साधला होता.
Suresh Dhas, Valmik Karad, Dhananjay Munde
Suresh Dhas, Valmik Karad, Dhananjay MundeSarkarnama
Published on
Updated on

Nagpur, 20 December : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरण संपूर्ण राज्यात गाजत असून भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी गुरुवारी हे प्रकरण विधानसभेत मांडले होते. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका आयजी दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्यात येणार आहे, अशी घोषणा केली आहे. या प्रकरणात कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचे नाव घेतले जात आहे. कराड यांच्या माध्यमातून नाव न घेता मुंडेंवर निशाणा साधला जात असून मुंडे मात्र गेली तीन दिवसांपासून अधिवेशनाला उपस्थित नसल्याची माहिती पुढे येत आहे.

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांना बेहाल करून मारण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातील आष्टीचे आमदार सुरेश धस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर यांनी हे प्रकरण विधानसभेत उपस्थित केले आहे. धस यांच्या भाषणाने तर अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या.

धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी वाल्मिक कराड हे आपले जवळचे कार्यकर्ते असल्याचे मान्य केले होते. विधानसभेतही सुरेश धस यांनी वाल्मिक कराड यांच्या आडून नाव न घेता मुंडेंवर निशाणा साधला होता. याशिवाय विरोधकांनीही या घटनेमागे वाल्मिक कराड असल्याचे म्हटलेले आहे, त्यामुळे कराड यांचे नाव दिवसेंदिवस या प्रकरणात पुढे येताना दिसत आहे.

Suresh Dhas, Valmik Karad, Dhananjay Munde
Solapur Politic's :मोहिते पाटलांच्या मदतीने आयुष्यात कुठलीही निवडणूक लढवणार नाही; राम सातपुतेंची घोषणा

एकीकडे कराड यांच्यावर आरोप होत असताना दुसरीकडे धनंजय मुंडे यांचीही गेली तीन दिवसांपासून अविशेनाला उपस्थिती नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मुंडे नेमके कुठे गेले, असा सवाल उपस्थित होते. हे प्रकरण विधानसभेत उपस्थित करणारे धस यांनीही तर धनंजय मुंडे यांनी तर माध्यमांसमोर उपस्थिती लावावी, समाजासमोर यावे, असे जाहीर आव्हान केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उत्तरावर मी समाधानी आहे. मात्र, भूमाफिया, मुरुममाफिया, वाळूमाफिया यांच्यावर कारवाई होणार आहे. खंडणी वाल्मिक कराड यांनी मागायला लावली असेल आणि त्यांनीच फोन केला असेल आणि त्यावरूनच संतोष देशमुख यांचा खून झाला असेल तर वाल्मिक कराड हे मोक्का आणि ३०२ चे आरोपी होतील, असेही सुरेश धस यांनी सांगितले.

सुरेश धस म्हणाले, धनंजय मुंडे हे त्यांचे शागीर्द आहेत. त्यांच्या शागीर्दवर एवढं सगळं होत असताना ते कुठे लपून बसले आहेत ते मला माहिती नाही. त्यांनी माध्यमांसमोर यायला पाहिजे. एखाद्या मंत्र्याला समाजाला तोंडसुद्धा दाखवू वाटत नसेल तर त्यांनी लवकरात लवकर समाजापुढे यावे, अशी माझी विनंती आहे.

Suresh Dhas, Valmik Karad, Dhananjay Munde
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे कधी मिळणार? फडणवीसांनी दिली खूशखबर

मंत्री असल्यामुळे धनंजय मुंडेंना फेअर केलं जाईल, असे मला वाटत नाही. आमचा देवेंद्र फडणवीस आणि न्यायालयावर विश्वास आहे. या प्रकरणाची डबल चौकशी लावली आहे. एक न्यायालयीन, तर दुसरी आयजी दर्जाच्या अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली चौकशी होणार आहे. केवळ पोलिस चौकशी लावली असती तर फेअर केलं गेलं असतं. पण न्यायालयापुढे कोण फेअर होईल. न्यायालयीन चौकशीमुळे आमचं संपूर्ण समाधान झालं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com