Ashish Jaiswal, Vishal Barbate Sarkarnama
विदर्भ

Ramtek Assembly Election : रामटेकचा गड कोण राखणार? दोन्ही शिवसेनेकडून उमेदवार जाहीर पण भाजप-काँग्रेसमध्ये नाराजी

Mahavikas Aghadi vs Mahayuti: शिवसेनेला मतदारसंघ सोडल्याने काँग्रेसमध्येही नाराजी होती. शेवटची संधी म्हणून गुरुवारी माजी मंत्र सुनील केदार, रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे आणि राजेंद्र मुळक उद्धव ठाकरेंच्या भेटीला गेले होते.

Rajesh Charpe

Nagpur News, 25 Oct : रामटेक विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार कोण असणार याबाबतचा सस्पेन्स आता संपला आहे. कारण माजी राज्यमंत्री व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांचा पत्ता कट झाला असून उद्धवसेनेने विशाल बरबटे (Vishal Barbate) यांना एबी फॉर्म दिला आहे.

महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) रामटेक मतदारसंघ शिवसेनेसाठी (उद्धव ठाकरे) सोडण्यात आला होता. ठाकरेंच्या शिवसेनेकडून विशाल बरबटे यांचं नावसुद्धा जाहीर केले होते. या मतदारसंघात सुमारे दहा वर्षांपासून निवडणुकीची तयारी करीत असलेल्या राजेंद्र मुळक यांची या मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा होती.

शिवसेनेला (Shivsena) मतदारसंघ सोडल्याने काँग्रेसमध्येही नाराजी होती. शेवटची संधी म्हणून गुरुवारी माजी मंत्र सुनील केदार, रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे आणि राजेंद्र मुळक उद्धव ठाकरेंच्या भेटीला गेले होते. हा मतदारसंघ काँग्रेसला सोडावा त्या बदल्यात उमरेड विधानसभा मतदारसंघ घ्यावा अशी विनंती करण्यात आली.

मात्र ठाकरेसेनेने रामटेक मतदारसंघ सोडण्यास नकार दिला. मुळक यांना लढायचेच असेल तर मशाल हाती घेण्याचा सल्ला दिला. त्यास मुळकांनी नकार दिला. रात्री उद्धव सेनेच्यावतीने विशाल बरबटे यांना एबी फॉर्म दिला आहे. आता त्यांचा सामाना शिंदेसेनेचे आमदार आशिष जयस्वाल (Ashish Jaiswal) यांच्याशी होणार आहे.

आशिष जयस्वाल यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये (BJP) मोठी नाराजी आहे. भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी येथे बंडखोरी करण्याची शक्यता आहे. जयस्वाल यांच्या नावाला उघड विरोध केल्याने रेड्डी यांना भाजपने सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केलं आहे.

हे बघता रेड्डी पुन्हा आपल्या गोंडवाना गणतंत्र पार्टीतून निवडणूक लढतील असे बोलले जात आहे. याचा फटका आशिष जयस्वाल यांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे बरबटे यांच्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज आहेत. त्यामुळे ते कोणाला साथ देतात? यावरच रामटेक मतदारसंघातील निकालाचा फैसला लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT