Nana Patole-Vijay Wadettiwar-Chandrashekhar Bawankule Sarkarnama
विदर्भ

Bawankule Vs Wadettiwar : विजय वडेट्टीवार बेछूट आरोप का करत आहेत? बावनकुळेंनी नाना पटोलेंचे नाव घेत गुपित फोडले

Vidharbh Congress News : काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते झाल्यापासून विजय वडेट्टीवार यांनी प्रचंड आक्रमक धोरण स्वीकारल्याचे दिसून येते. ते रोज कुठलीही भीडभाड न बाळगता महायुतीचे मंत्री आणि नेत्यांवर थेट आरोप करत आहेत.

Rajesh Charpe

Nagpur, 11 April : काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते झाल्यापासून विजय वडेट्टीवार यांनी प्रचंड आक्रमक धोरण स्वीकारल्याचे दिसून येते. ते रोज कुठलीही भीडभाड न बाळगता महायुतीचे मंत्री आणि नेत्यांवर थेट आरोप करत आहेत. पुण्यातील मंगेशकर हॉस्पिटलमध्ये घडलेल्या घटनेनंतर त्यांनी लता मंगशेकर कुटुंबीयांनाच दोष देणे सुरू केले आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनुकळे यांनी वडेट्टीवारांना चांगलेच सुनावले.

तुमची स्पर्धा नाना पटोले (Nana Patole) यांच्याशी आहे. हे करीत असताना आपण कोणावर टीका करतो? त्यांची समाजात प्रतिमा काय? समाजातील त्यांचे स्थान काय? याचा तरी विचार करावा, असा टोलाही बावनकुळे यांनी विजय वडेट्टीवार यांना लगावला.

विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) हे आताच काँग्रेस पक्षाच्या विधीमंडळाचे नेते झाले आहेत. त्यांना काँग्रेस नेत्यांना आपले अस्तित्व दाखवायचे आहे. नेतृत्व सिद्ध करायचे आहे. याकरिता ते नाना पटोले यांच्याशी स्पर्धा करत आहे. याकरिता कुठल्याही विषयावर शहनिशा न करता आरोप करायचे आणि आपल्याकडे लक्ष वेधून घ्यायचा, असा त्यांचा खटाटोप सुरू आहे, असा टोलाही बावनकुळे यांनी त्यांना हाणला.

मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जो काही प्रकार झाला, त्याची चौकशी सुरू आहे. नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त केल्या जातील. विजय वडेट्टीवार यांनीसुद्धा त्या लक्षात आणून द्याव्यात. दुरुस्ती करण्यात पुढाकार घ्यावा.

स्फोटक विधाने करण्याआधी त्यांनी सर्व काही तपासून घेतले पाहिजे. आपण कोणावर आरोप करतो, त्यांचे समाजातील स्थान आणि प्रतिमा काय आहे, याचाही विचार करावा, असा सल्लाही बावनकुळे यांनी वडेट्टीवारांना दिला.

आम्हाला केवळ आरोपांसाठी आरोप करायचे नाहीत. काँग्रेसच्या कार्यकाळात कोणी काय केले, हे आम्हाला ठावूक आहे. ती प्रकरणे आम्ही काढली तर राजकारण करता असा आपणाच आरोप कराल, असे सांगून बावनकुळे यांनी वडेट्टीवारांना सबुरीचा सल्लाही दिला आहे.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT