Sharad Pawar Sarkarnama
विदर्भ

Sharad Pawar on 2024 Election: मविआ 2024च्या निवडणुका एकत्र लढणार का? शरद पवारांच्या उत्तराने खळबळ

MVA will take part in the 2024 election together: महाविकास आघाडीतील नेते परस्पर विरोधात विधाने करत आहेत

सरकारनामा ब्युरो

Sharad Pawar Statement On MVA: राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा संघर्ष तीव्र होत आहे. राज्यातील आगामी २०२४ च्या निवडणुकांसाठी महाविकास आघाडीने तयारी केलेली असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. शरद पवार (Sharad Pawar Latest news) रविवारी (२३ एप्रिल) अमरावती दौऱ्यावर होते. या दौऱ्यात शरद पवारांनी 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकांसंदर्भात मोठं विधान केलं आहे. (Will Mavia contest the 2024 elections together? Excitement with Sharad Pawar's answer)

2024 च्या निवडणुका मविआ (Mahavikas Aghadi) एकत्र लढेल का? तसेच वंचित बहुजन आघाडीसोबत येईल का? असे सवाल त्यांना विचारण्यात आले. यावर '' अद्याप वंचित आघाडीसोबत चर्चा झालेली नाही. वंचितसोबत फक्त कर्नाटकातमधील मर्यादित जागांविषयी चर्चा झाली आहे. बाकी दुसरी कसलीही चर्चा झाली नसल्याचे उत्तर शरद पवार यांनी दिले. तसेच, 2024 च्या निवडणुका मविआ एकत्र लढेल का? या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी फक्त एकत्र लढण्याची इच्छा पुरेशी नसते. असं म्हटलं आहे.पण त्यांच्या या उत्तरमुळे मात्र आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते अजित पवार नाराज असून ते भाजपसोबत जाण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अजित पवारांनी या चर्चा फेटाळल्या असल्या तरी त्यांच्याबाबत अद्यापही राजकीय वर्तुळात दबक्या आवाजाच चर्चा सुरुच असल्याचीही माहिती आहे. (Maharashtra Politics)

राज्यातले सरकार पाडले, सर्वोच्च न्यायालयाने जर 16 आमदारांना अपात्र ठरवले तर अजित पवार यांना फोडण्याच्या चर्चा सुरु आहेत. यावर पवार म्हणाले, ''उद्या कुणी फोडण्याची भूमिका घेत असले तर ती त्यांची भूमिका असले. मात्र, त्यावर आम्हाला काय भूमिका घ्यायची आहे, ती आम्ही भक्कम पणे घेऊ. मात्र, ती भूमिका काय असेल ते आताच सांगता येणार नाही. कारण या बाबात आम्ही चर्चाच केलेली नाही,'' असे पवार यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडीतील नेते परस्पर विरोधात विधाने करत आहेत. यावरही पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पवार म्हणाले, ''मी उद्योगपती गौतम अदानी यांच्या बाबतीत फक्त सांगितले की जेपीसीच्या मागणीने काही साध्य होणार नाही. कारण जेपीसीमध्ये साधारण 21 सदस्य असतात. त्यामध्ये १५ लोक भाजपचे असणार आणि ६ लोक विरोधकांचे असतील, समितीचा अध्यक्षही भाजपचा असेल. त्यातच या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानेही समिती नेमलेली आहे. त्यामुळे मी सांगितले की जेपीसीपेक्षा सर्वोच्च न्यायालयाची समिती प्रभावी ठरेल. त्या संदर्भात मी मत मांडले. मात्र, विरोधी पक्षांनी जेपीसीची मागणी सुरुच ठेवली आहे. त्याला आमचा विरोध नाही, असेही पवार यांनी सांगितले.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT