Amritpal Singh Arrested: पंजाब दे वारीसचा म्होरक्या ते गुरुद्वाराबाहेर अटक; अमृतपालसोबत गेल्या दोन महिन्यात काय घडलं? वाचा सविस्तर

Amritpal Singh News Update: पंजाबचा खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग याला पोलिसांनी मोगा येथील गुरुद्वारातून ताब्यात घेतले
Punjab News :  Amritpal Singh
Punjab News : Amritpal SinghSarkarnama
Published on
Updated on

Punjab News: पंजाबचा खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग (Amritpalsingh news) याला पोलिसांनी मोगा येथील गुरुद्वारातून ताब्यात घेतले आहे. तब्बल ३६ दिवसांनी अमृतपालला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अजनाळा घटनेनंतर तो फरार झाला होता.या प्रकरणी पंजाब पोलिसांनी गेल्या दोन महिन्यात घडलेला घटनांक्रम सांगितला आहे. (What happened with Amritpal Singh in the last two months? Read in detail)

आत्मसमर्पणाच्या उद्देशानेच अमृतपाल काल (२३ एप्रिल) सकाळीच पंजाबमधील मोगा येथे पोहचला होता. ज्या ठिकाणा त्याने सहा महिन्यांपुर्वी पंजाब दे वारीस संघटनेच्या प्रमुख पद स्विकारले तेच ठिकाण त्याने आत्मसमर्पणासाठी निवडले होते. शेवटचा संदेश देण्यासाठी त्याने या ठिकाणाची निवड केली होती. अमृतपाल मोगा येथील रोडे गावतील गुरुद्वारात असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी संपुर्ण गावात पोलिसांची मोठी फौज तैनात केली होती. अमृतपाल रोडे गावातील गुरुद्वारात होता. (National Political news)

Punjab News :  Amritpal Singh
Eknath Shinde On Uddhav Thackeray: शिवसेना कुणाची हे सांगायला पाकिस्तानच्या प्रमाणपत्राची गरज ? ; मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोला

सकाळीच तो गुरुद्वारात प्रवचन करत असताना साध्या वेशातले पोलीसही तिथे उपस्थित होते. पण गुरुद्वाराची पवित्रता राखण्यासाठी पोलिसांनी गुरुद्वारात प्रवेश करणे टाळले. त्यानंतर तो स्वत: गुरुद्वारातून बाहेर आला आणि त्याने आत्मसमर्पण केलं. अटक केल्यानंतर अमृतपालला आसामच्या दिब्रुगड येथील तुरुंगात नेण्यात आले आहे. पण अमृतपालने आत्मसमर्पणासाठी मोगा गावचीच का निवड केली. असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

मोगा जिल्ह्यातील रोडे गाव हे दहशतवादी जर्नेल सिंह भिंद्रनवाला यांचे वडिलोपार्जित गाव आहे. गेल्या वर्षी याच गावात आयोजित कार्यक्रमात अमृतपालची वारिस पंजाब दे संघटनेच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. या गावात जर्नेलसिंग भिंद्रनवाला यांचा जन्म झाला त्या ठिकाणी गुरुद्वारा बांधण्यात आला आहे. अटकेपूर्वी अमृतपालने याच गुरुद्वारातून भाषण केले होते. (Amritpal Singh Arrested)

Punjab News :  Amritpal Singh
Chh. SambhajiNagar Riot News: छत्रपती संभाजीनगर दंगल प्रकरणात मोठी अपडेट; धर्म अभ्यासकासह 'ते' 8 जण अद्यापही फरारच

अमृतपालने सकाळी गुरुद्वारात दर्शन घेतले. याच वेळी त्याने आपल्या आत्मसमर्पणाचे कारणही सांगितले. ''मी फरार नाही, हे मला जनतेसमोर सिद्ध करायचे होते. मी जगासाठी दोषी असून शकतो पण ईश्वरासाठी नाही. या भूमीवर लढलो. याच भूमीवर लढत राहु.मला माझ्या भूमीला सोडून कोठेही जायचे नाही. मी आज सच्चे पातशाहच्या भूमीवर आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतल्याचे त्याने सांगितलं. (Panjab news)

अमृतपालचे नऊ साथीदार आधीपासूनच दिब्रुगड तुरुंगात आहेत. पण अमृतपालला त्याच्या साथीदारांपासून दूर तुरुंगाच्या वेगळ्या सेलमध्ये ठेवण्यात आले आहे.आयबी, रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (रॉ) व इतर केंद्रीय तपास संस्थांचे एक पथक अमृतपालची चौकशी करणार आहे. त्याला मिळणाऱ्या फंडिंगविषयी त्याची चौकशी केली जाणार आहे. त्याची फंडिंगविषयी चाैकशी हाेईल.

असा होता अमृतपालला प्रवास ?

अमृतपाल सिंगचा जन्म 18 जानेवारी 1993 रोजी अमृतसर जिल्ह्यातील जलूपूर खेडा गावात झाला.त्याच्या वडिलांचे नाव तरसेम सिंग आणि आईचे नाव बलविंदर कौर आहे.

अमृतपाल सिंग काही वर्षे दुबईत ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करत होता.गेल्या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये तो भारतात परतला.

इंटरनेटच्या माध्यमातून त्याने खलिस्तान,भिंद्रनवाले आणि त्यासंबंधीची माहिती मिळवली

Punjab News :  Amritpal Singh
Daund News : पक्ष संपवण्यासाठी राष्ट्रवादीची सुपारी; शिवसेना जिल्हा प्रमुखपदाचा राजीनामा देत पासलकरांचा गंभीर आरोप!

२९ सप्टेंबर २०२२ रोजी भिंद्रनवालेच्या छायाचित्रासमोर हजारो लोकांच्या उपस्थितीत त्याने शपथ घेतली.

२३ फेब्रुवारी २०२३ रोजी पंजाबमधील अजनाला येथे अमृतपालच्या नेतृत्त्वात सशस्त्र जमावाने पोलीस स्टेशनवर हल्ला केला.

आपल्या एका सहकाऱ्याला सोडवण्यासाठी सशस्त्र जमावाने पोलीस स्टेशनवर हल्ला केला होता.

पोलीस आणि जमावात झालेल्या झटापटीत सहा पोलीस गंभीर जखमी झाले.

तेव्हापासून तो फरार होता.अखेर काल त्याला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले.

२३ एप्रिल २०२३ अमृतपालला गुरुद्वाराच्या बाहेर पोलिसांनी ताब्यात घेतले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com