Nagpur News : काँग्रेसच्या राहुल गांधींसह वरिष्ठ नेतेमंडळींवर टीका, महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप अशा विविध कारणांमुळे अखेर आणि सततच्या गैरवर्तनामुळे काँग्रेस पक्षाने मोठा निर्णय घेत आशिष देशमुख यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. यानंतर ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा जोर धरत आहे. याचदरम्यान, राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे.
निलंबित काँग्रेस नेते आशिष देशमुख हे सोमवारी(दि.२४) सकाळीच चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी येथील कार्यालयात दाखल झाले. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकत्र बसून नाश्ता केला. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
यानंतर आशिष देशमुख(Ashish Deshmukh) यांनी माध्यमांशी संवाद साधला. देशमुख म्हणाले, बावनकुळे हे विधानसभेत आमच्यासोबत आमदार होते. आमचे त्यावेळचे ऊर्जावान ऊर्जा मंत्री होते. नागपूरसाठी पालकमंत्री त्यांनी उल्लेखनीय काम केलं होतं. नागपूरच्या कोराडी येथील कार्यालयात त्यांनी मला नाश्त्यासाठी बोलावलं. त्यासाठी मी आलो होतो.
तसेच चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असले तरी आमचे जिवलग मित्र आहेत. ते विधानपरिषदेत आहेत. त्यामुळे काही कामं असतात. त्यांनी नाश्त्याला बोलावलं म्हणून नाही म्हणता आलं नाही असं त्यांनी सांगितलं. तसेच त्यांच्याकडे ब्रेकफास्ट करण्यासाठी आलो होतो. कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचंही देशमुख यांनी स्पष्ट केलं.
नागपूर भाजपच्या कार्यालयात चंद्रशेखर बावनकुळे दाखल झाले आहेत. या कार्यालयात देशमुख आणि बावनकुळेंच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळता चर्चेला उधाण आले. 2009मध्ये मी सावनेरमध्ये चांगली लढत दिली. 2014मध्ये अनिल देशमुख यांना पराभूत केलं. 2019मध्ये मी नागपूर दक्षिण आणि पश्चिममध्ये फडणवीस यांना लढत दिली होती, हेही लक्षात ठेवलं पाहिजे. नाश्त्याच्या पलिकडे नक्कीच काही चर्चा झाली नाही. चाय पे चर्चा नाही. नाश्ताच आहे डायरेक्ट, असं ते म्हणाले.
इतर पक्षात जाण्याचा प्रश्न नाही...
मी काँग्रेस पक्षात आहे. पक्षाच्या शिस्तभंग समितीच्या नोटिशीला उत्तर देऊन इतके दिवस उलटल्यानंतरही माझ्यावर पक्षाकडूनकोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. यावरुन माझे म्हणणं पक्षाला पटलं आहे असंही देशमुख यांनी सांगितले. तसेच मला पक्षातून काढण्याची कारवाई ते करणार नाहीत. त्यामुळे इतरत्र कोणत्याही पक्षाकडे जाण्याचा प्रश्न आता उद्भवत नाही असंही आशिष देशमुख यावेळी म्हणाले.
शरद पवारांची भेट अन्...
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नागपूर दौऱ्यावर होते. या दौऱ्यातच देशमुख यांनी शरद पवारांची आवर्जून भेट घेतली होती. या भेटीनंतरच देशमुखांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाबद्दल चर्चांना सुरुवात झाली होती. त्यावर देशमुख यांनी सध्यातरी मी काँग्रेस पक्षात आहे. आणि दुसऱ्या पक्षात जाण्याचा प्रश्नच येत नसल्याचंही सांगितले.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.