Sharad Pawar Uddhav Thackeray Raj Thackeray  sarkarnama
विदर्भ

Sharad Pawar News: राज ठाकरे यांच्यामुळे महाविकास आघाडी फुटणार का? शरद पवारांनी ठेवला सस्पेन्स कायम

Raj Thackeray And Uddhav Thackeray : हिंदी सक्तीला विरोध करण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आले होते. दोघांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर हिंदी सक्तीचा निर्णय महायुती सरकारने मागे घेतला. त्यानंतरही विजय सभा घेऊन दोन्ही ठाकरे बंधू यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकत्र येणार असल्याचे संकेत दिले होते.

Rajesh Charpe

थोडक्यात बातमी:

  1. महाराष्ट्रात राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेला वेग आला असून, महापालिकेच्या निवडणुकीत दोघे सोबत लढतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

  2. काँग्रेसला राज ठाकरे महाविकास आघाडीत सहभागी होण्यास विरोध आहे, तर शरद पवार यांनी याबाबत अद्याप भूमिका जाहीर न करता सस्पेन्स कायम ठेवला आहे.

  3. हिंदी सक्तीविरोधी आंदोलनानंतर दोन्ही भावांच्या भेटीगाठी वाढल्या असून, त्यांच्या युतीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल होण्याची चर्चा आहे.

Nagpur News: राज आणि उद्धव ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सध्या महाराष्ट्रात सुरू आहेत. दोघा भावांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. त्यावरून मुंबई महापालिकेची निवडणूक ते सोबत लढतील असा तर्क लावल्या जात आहे. मात्र, राज ठाकरे (Raj Thakeray) यांना महाविकास आघाडीत घेण्यास काँग्रेसचा विरोध आहे, असे झाल्यास आघाडीत फूट पडेल असे सांगण्यात येत आहे.

शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने अद्याप याबाबत भूमिका जाहीर केली नाही. मात्र, नागपूरमध्ये शनिवारी (ता.9 ऑगस्ट) शरद पवार (Sharad Pawar) यांनी आधी त्यांना एकत्र येऊ तर द्या नंतर आम्ही आमचा निर्णय कळवू असे सांगून सस्पेंस कायम ठेवला.

हिंदी सक्तीला विरोध करण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आले होते. दोघांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर हिंदी सक्तीचा निर्णय महायुती सरकारने मागे घेतला. त्यानंतरही विजय सभा घेऊन दोन्ही ठाकरे बंधू यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकत्र येणार असल्याचे संकेत दिले होते.

या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सहभागी झाले होते. मंचावर फक्त राज आणि उद्धव ठाकरे बसले होते. मात्र खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी या विजयी सभेला हजेरी लावली होती. आमदार रोहित पवार यांनी मराठीसाठी सर्वांनी या मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते.

यावरून सध्या महाराष्ट्राच्या राज्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. दोन्ही भाऊ एकत्र आल्यास महापालिकेच्या निवडणुकीचे समीकरण बदलणार असले सांगण्यात येते. मात्र राज ठाकरे यांना महाविकास आघाडीत घेण्यास काँग्रेसचा विरोध असल्याचे सांगण्यात येते. राज-उद्धव ठाकरे एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटेल असेही दावे केले जात आहे.

दोन भावांच्या युतीवर शरद पवार यांनी आज भाष्य केले. दोन भाऊ काय निर्णय घेतात हे त्यांना ठरवू द्या. ते एकत्र येत असल्याने अनेकांची झोप उडाली आहे. ते सोबत येणार असतील तर आम्हाला आनंदच आहे. आल्यानंतर आम्ही आमचा निर्णय घेऊ असे शरद पवार यांनी सांगितले.

'आंबेडकरांच्या भूकंपाची मी वाट बघतो...'

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार भाजपात जाणार आणि महाराष्ट्रात भूकंप होणार असल्याचा दावा केला होता. याबाबत विचारणा केली असता शरद पवार यांनी आम्ही त्यांच्या भूकंपाची वाट बघत असल्याचा टोला लगावला.

प्र.१: राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याची चर्चा का सुरू आहे?
उ: त्यांच्या भेटीगाठी वाढल्यामुळे आणि आंदोलनांतून एकत्र दिसल्यामुळे चर्चा रंगली आहे.

प्र.२: महाविकास आघाडीत राज ठाकरे यांना घेण्यास कोणाचा विरोध आहे?
उ: काँग्रेसचा विरोध आहे.

प्र.३: शरद पवार यांनी याबाबत काय भूमिका घेतली आहे?
उ: त्यांनी आधी दोघे एकत्र यावेत, नंतर आम्ही निर्णय घेऊ असे सांगितले आहे.

प्र.४: राज-उद्धव ठाकरे युतीमुळे काय बदल होऊ शकतो?
उ: महापालिकेच्या निवडणुकीचे राजकीय समीकरण बदलू शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT