Sanjay Rathod
Sanjay Rathod Sarkarnama
विदर्भ

राठोडांना महिला आघाडीचा झटका : बाळासाहेबांचा फोटो काढायला लावला...

सरकारनामा ब्यूरो

Sanjay Rathod : यवतमाळ : राज्यातील सत्तासंघर्षानंतर शिवसैनिकांकडून (Shivsena) बंडखोर आमदार, खासदारांवर कठोर टीका केल्या जात आहेत. त्यांचा प्रत्यय पुन्हा एकदा जिल्ह्यात आला. आज मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) तसेच खासदार भावना गवळी (Bhavna Gawli) यांचे बंडानंतर पहिल्यांदाज जिल्ह्यात आगमन झाले. याविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले. राठोड यांच्या फलकावर असलेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो शिवसैनिकांनी काढला.

शिवसेनेने अनेक सामान्यांना सत्तेची संधी दिली आहे. असे असतानाही शिवसेनेमुळे जे आज मोठे झाले, ते पक्षाला सोडून गेले. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील शिवसैनिक संतापले आहेत. मंत्री झाल्यानंतर शनिवार (ता.13) संजय राठोड यांचे जिल्ह्यात आगमन झाले. यासाठी राठोड समर्थकांनी जय्यत तयारी केली होती. बंडानंतर राठोड यांनी एकप्रकारे शक्तीप्रदर्शनच केले. त्यापूर्वी शिवसैनिकांनी स्थानिक दत्त चौकात राठोड यांच्या स्वागत फलकावर लावण्यात आलेला शिवसेनानप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो काढला.

बंडखोरांनी शिवसेनाप्रमुखांचा फोटो न लावता निवडणूक जिंकून दाखवावी, असे आव्हान राठोड यांना केले. 'इडी'च्या प्रकरणात अडकल्यानंतर तब्बल तीन वर्षांनंतर खासदार भावना गवळी जिल्ह्यात आल्या. त्यांच्या विरोधातही महिला शिवसैनिकांनी आंदोलन केले. पक्षांशी गद्दारी करुन खासदार गवळी येत असल्याने महिला शिवसैनिकांनी त्यांच्या निषेधाचे फलक झळकावले.

या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड, संतोष ढवळे, किशोर इंगळे, चेतन शिरसाट, मंदा गाडेकर, संगीता पुरी, अंजली गिरी, संगीता राऊत, वैशाली कनाके, दुर्गा चंदनखेडे, जयश्री राऊत, बबिता राऊत, चंदा मेश्राम, स्मिता दुर्गे, राधा दपडे यांचेसहन महिला आघाडी तसेच शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT