Yashomati Thakur Sarkarnama
विदर्भ

Abhishek Ghosalkar : पुरोगामी महाराष्ट्राला डाग लावला; यशोमती ठाकूर कुणाबद्दल बोलल्या..

Amar Ghatare

Amravati Politics : मुंबईती अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणावर काँग्रेसच्या माजी मंत्री तथा आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांनी सरकारविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला आहे. सत्ताधारी लोक महाराष्ट्राचा बिहार करीत असल्याची टीका अॅड. ठाकूर यांनी सरकारवर सडकून केली. अमरावती येथे त्या राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवर बोलत होत्या.

महाराष्ट्रात गुन्हेगारांना आता पोलिसांची आणि कायद्याची भीती राहिलेली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीही आमदार यशोमती ठाकूर यांनी केली.

मुंबईतील गोळीबार आणि आमदार गणपत गायकवाड यांचे प्रकरण पुरोगामी महाराष्ट्राला डाग लावणारे आहे. अशा प्रकरणातून सत्ताधाऱ्यांची पोलिस आणि गुन्हेगारांवर पकड नसल्याचे दिसते. अशा सत्ताधाऱ्यांना जनता कधीच सोडणार नाही, असेही अॅड. यशोमती ठाकूर स्पष्टपणे म्हणाल्या. गोळीबार करणारे सगळे आता म्हणत आहेत की, आमचे ‘बॉस’ सागर व वर्षा बंगल्यावर राहतात. त्यावरून सरकारमध्ये काय सुरू आहे, याची कल्पना येते असेही त्या म्हणाल्या.

सत्ताधाऱ्यांना पुरोगामी महाराष्ट्राचे विचार, महाराष्ट्राचे पावित्र्य सांभाळता येत नसेल तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, असेही ठाकूर यांनी नमूद केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडै गृहमंत्री पदाची जबाबदारी आहे. त्यांनी तर सगळ्यात आधी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यायला पाहिजे, अशी मागणीही ठाकूर यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उपराजधानी नागपुरात ‘क्राइम रेट’ वाढला आहे. पुण्यात ‘कोयता गँग’चा धुमाकूळ सुरू आहे. अशा टोळ्यांवर सरकारचे नियंत्रण नाही. मंत्रालयात सराईत गुन्हेगार रिल्स तयार करतात. मुख्यमंत्री, त्यांचे चिरंजीव गुन्हेगारांना भेटतात. दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीवही गुन्हेगारांच्या संपर्कात राहतात. महत्त्वाच्या पदांवर राहणारे मंत्रीच जर गुन्हेगारांच्या संपर्कात राहात असतील तर सामान्यांची काय गत असेल, याचा विचार न केलेलाच बरा, असे ठाकूर म्हणाल्या.

महाराष्ट्रातील पोलिस अधिकारी गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी पुढाकार घेत आहेत. परंतु त्यांना तर मंत्र्यांचेच अभय असेल तर अधिकारी कितीही प्रामाणिक अधिकारी असले तरी गुन्हेगारीवर नियंत्रण येणारच कसे, असा प्रश्नही ठाकूर यांनी उपस्थित केला. वाढत्या गुन्हेगारीचा आणि गँगस्टर पोसल्याचा ब्रह्मराक्षक एक दिवस भस्मासूर बनणार आहे. हा भस्मासूर याच सत्ताधाऱ्यांच्या डोक्यावर कधी हात ठेवेल हे त्यांना कळणारही नाही. त्यामुळे सरकार किती दिवस अशा गुंडांना अभय देणार हे पाहुच असेही अॅड. ठाकूर यांनी नमूद केले.

Edited By : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT