Yavatmal Umarkhed news : यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड नगरपालिकेच्या अब्दुल गफूर शाह उर्दू शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमात पाकिस्तानी गीताचे विद्यार्थ्याकडून गायन आणि त्यावर नृत्य करून घेण्यात आल्याप्रकरणी दोन शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी भाजपचे नगरसेवक गोपाल कलाने यांनी पोलिसांत तक्रार केली होती. मुख्याध्यापक अन्सारउल्ला खान अब्दुल मन्नान खान (वय 55), गीताच्या नृत्याची रचना करणारे शिक्षक मोहम्मद फिरोज आशाजी (वय 54) या दोघांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
उमरखेड नगरपालिकेच्या उर्दू शाळेत पाकिस्तानातील ‘ए मर्द ए मुजाहिद तेरी यलगार कहा है’ गीत वाजविण्यात आले. या गीतावर भारतात (India) बंदी आहे. या गाण्यातून लोकांना चिथावणी दिली जाते. पाकिस्तानकडून त्यांच्या नागरिकांना आणि सैनिकांना युद्धासाठी प्रवृत्त करण्यासाठी हे गीत म्हणण्यात येते.
शाळा (school) प्रशासनाने लहान मुलांकडून देशविरोधी गाण्यावर नृत्य करवून घेणारे शिक्षक हे देशविरोधी कृत्य करत आहे. शालेय विद्यार्थ्याकडून अशा स्वरूपाचे गीत गायन आणि नृत्य करून घेणे हे सार्वभौमत्वाविरोधात भावना निर्माण करणारे आणि सामाजिक व धार्मिक तेढ वाढविणारे आहे.
संबंधित शिक्षक, शाळा प्रशासनातील जबाबदार शिक्षक यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार भाजप नगरसेवक गोपाल कलाने यांनी केली होती. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी चौकशी केली अन् त्यात तथ्य आढळले.
त्यानुसार 12 फेब्रुवारीला उमरखेड पोलिस ठाण्यात शाळेचे मुख्याध्यापक अन्सारउल्ला खान अब्दुल मन्नान खान (वय 55), गीताच्या नृत्याची रचना करणारे शिक्षक मोहम्मद फिरोज आशाजी (वय 54) या दोघांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
नगरसेवक गोपाळ कलाने यांनी दावा केला आहे की, या गाण्याला पाकिस्तानमध्ये राष्ट्रीय महत्त्व होते आणि 1962च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान त्याचा वापर करण्यात आला होता. हे गाणे स्नेहसंमेलन शाळेतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आले. यामुळे स्थानिक पातळीवरून निषेधाची लाट उसळली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.