Sanjay Shirsat: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचा पैशाच्या बॅगेसह एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याव्हिडिओत बेडवर बसून शिरसाट सिगारेटही ओढताना दिसत आहेत. हा व्हिडिओ ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी समोर आणला आहे. विशेष म्हणजे हा व्हिडिओ आपलाच असल्याचं खुद्द शिरसाट यांनी मान्य केलं आहे. तसंच चांगल्या काम करणाऱ्या माणसांना बदनाम करण्याचं हे कारस्थान असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
संजय शिरसाटांचा जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्यामध्ये संजय शिरसाट बेडवर बसलेले आहेत. आपल्या हातातील सिगारेट ते ओढत आहेत. तसंच व्हिडिओ पॅन होताना बाजुला एक मोठी उघडी असलेली बॅग दिसते आहे, त्यामध्ये पैशांच्या नोटांसदृश्य काही वस्तू आहे. तसंच बेडरुममध्ये फरशीवर एक कुत्राही बसलेला आहे. या व्हिडिओवर संजय राऊत यांनी आक्षेप घेतला असून व्हिडिओतील बॅगेत नोटांची बंडलं असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
संजय शिरसाट म्हणतात, "व्हिडिओत माझं घर आणि मी बेडरुममध्ये बनियनवर बसलेलो आहे. माझ्याजवळ माझा लाडका कुत्रा आहे, एक बॅग तिथं ठेवलेली आहे. याचा अर्थ असा होतो की मी कुठेतरी प्रवासातून आलो आहे. कपडे काढले आहेत आणि माझ्या बेडवर मी बसलेलो आहे. अरे मुर्खांनो एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर अलमाऱ्या काय मेल्यात का? त्या सगळ्या काढून टाकल्यात काय? आल्याबरोबर नोटा असतील तर मी त्या अलमाऱ्यामध्ये ठोसल्या असत्या. पण कपड्याच्या बॅगेला सुद्धा यांना नोटा दिसतात. यांना पैशांशिवाय काय दिसत नाही. एकदा एकनाथ शिंदे हे विमानातून खाली उतरुन त्यांचे बॉडीगार्ड बॅगा घेऊन चालले होते तर त्यातही पैसे असल्याचं हे सांगत होते"
यांना कपडे ठेवायला बॅगा लागत नाहीतर पैसे ठेवायला बॅगा लागतात, असं एकंदर यांचं वर्तन आहे. माझ्या बेडरुममध्ये प्रवासातून आलेली बॅग लटकलेली कुठेतरी ठेवलेली आहे. याची बातमी होते याचं मला आश्चर्य वाटतं. आमच्याकडं मातोश्री टू नाही. माझं घर माझ्या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणसाला विचारा. कोणी हा व्हिडिओ काढला असेल त्याला मला दोष द्यायचा नाही. माझ्याकडं कोणालाही चिठ्ठी देऊन आत सोडलं जात नाही. त्यासाठी काम काय, गाव काय, नाव काय हे विचारलं जात नाही, कार्यकर्त्यांसाठी आपण आहोत.
जर हा व्हिडिओ कोणी काढला असेल तर त्यात गैर काहीच नाही, त्यात गैर समजायचं काही कारणचं नाही. यांचे व्हिडिओ पाहा ना? अरे दुसऱ्या महिलांचा छळ करणारे तुम्ही आमच्या बॅगा काय पाहता? त्यामुळं या व्हिडिओचं मला आश्चर्य करण्याचं काही कारण नाही. मला हे टार्गेट करत आहेत माझ्यावर आणि माझ्या करियरवर त्याचा काहीही परिणाम होत नाही, असं स्पष्टीकरण संजय शिरसाट यांनी आपल्या व्हायरल व्हिडिओवर दिलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.