Ashok Chavan Sarkarnama
महाराष्ट्र

Ashok Chavan News : विधानसभा शिंदेंच्या नेतृत्वाखालीच; पण मुख्यमंत्रिपदाचा निर्णय... अशोक चव्हाणांचं मोठं विधान

Political News : सत्ताधारी व विरोधक एकमेकावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं विधान केलं आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी व विरोधक एकमेकावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं विधान केलं आहे.

आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली केला जाणार आहे. तर महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाचा निर्णय निवडणुकीनंतर जाहीर करण्यात येणार आहे, असे भाजप (Bjp) नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) एका वृत्तवहिनीशी बोलताना म्हणाले. (Ashok Chavan News)

विधानसभा निवडणूक महायुती एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढणार आहे. निवडणुकीच्या निकलानंतर पुढचा मुख्यमंत्री कोण असणार? हे महायुतीतील सर्व पक्ष एकत्रीत ठरवतील. विधानसभेला कोणाला किती जागा मिळाल्या हे पू्र्णपणे तेथील परिस्थितीवर अवलंबून असणार आहे. त्यासोबतच ज्या पक्षाची जिंकण्याची शक्यता जास्त आहे, त्या पक्षाला ती जागा दिली जाणार असल्याचे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

बदलापूर येथे घडलेली घटना अतिशय गंभीर आहे. या घटनेनंतर चिंतेचे वातावरण आहे. अशा घटनांचा पीडितेच्या आयुष्यावर त्यासोबतच तिच्या कुटुंबावर देखील परिणाम झाला आहे. हा राजकीय मुद्दा नाही मात्र काही जण केवळ विरोध करण्यासाठी गदारोळ करीत त्यावर राजकारण करत आहेत, असा आरोप यावेळी अशोक चव्हाण यांनी केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारच्या काळात मराठा आरक्षणाच्या प्रक्रियेला वेग आला आहे. राज्यातील नागरिकांना दहा टक्के आरक्षणाचा फायदा जनतेला झाला आहे. ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्यांना ओबीसी सर्टिफिकेट मिळले आहे, त्यामुळे बऱ्याच अंशी दिलासा मिळाला असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

मराठा आरक्षणाबाबत अजून काही प्रश्न प्रलंबीत आहेत. त्यासाठी गेल्या काही दिवसापासून सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात येत आहे. मात्र, या सर्वपक्षीय बैठकीला ना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते येत आहेत ना शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपस्थित राहत नाहीत. मराठा आरक्षण हा राजकीय नाही तर सामाजिक प्रश्न असल्याचे सांगत त्यांनी या साठी सर्व जणांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT