Washim Assembly Election: वाशिम जिल्ह्यावर कोणाचे वर्चस्व; मविआ, महायुतीची धाकधूक वाढली

Political News : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वाशिम जिल्ह्यात इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. असल्याने तिकीट वाटपासाठी पक्षाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
Mahavikas Aghadi Vs Mahayuti
Mahavikas Aghadi Vs Mahayuti Sarkarnama
Published on
Updated on

Wahim News : वाशिम जिल्ह्यात एकूण तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील दोन विधानसभा मतदारसंघ, वाशीम आणि कारंजा हे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात येतात. तर अकोला लोकसभा मतदारसंघात रिसोड या एका मतदारसंघाचा समावेश आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या संजय देशमुखांना (Sanjay Deshmukh) वाशिम आणि कारंजा या दोन मतदारसंघातून 90 हजार मताची आघाडी मिळाली आहे, तर रिसोड मतदारसंघातून भाजपच्या (Bjp) उमेदवाराला लीड मिळाले आहे. त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यावर कोणाचे वर्चस्व असणार याची उत्सुकता सर्वाना लागली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वाशिम जिल्ह्यात इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. असल्याने तिकीट वाटपासाठी पक्षाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. याठिकाणी महाविकास आघाडी व महायुतीमध्ये इच्छुक जास्त असल्याने कोणाला उमेदवारी मिळणार यावरून धाकधूक वाढली आहे.

वाशीम जिल्ह्यातील पक्षीय बलाबल

वाशिमधील तीन आमदारांपैकी एक आमदार काँग्रेसचा आहे तर एक भाजपचा आहे. कारंजा मतदारसंघातील जागा रिक्त असून त्या ठिकाणी भाजपचे दिवंगत आमदार राजेंद्र पाटणी यांनी प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे तीन पैकी एका मतदारसंघात काँग्रेस तर एका मतदारसंघात भाजपचा आमदार आहे.

वाशिम जिल्ह्यातील आमदारांची यादी

रिसोड - अमित सुभाष झनक (काँग्रेस)

वाशिम - लखन सहदेव मलिक (भाजप)

कारंजा - सध्या रिक्त ( याआधी दिवंगत राजेंद्र पाटणी, भाजप)

Mahavikas Aghadi Vs Mahayuti
Bhandara Assembly Election: भंडारा जिल्ह्यातील लढतीत काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा लागणार कस ?

2019 च्या विधानसभा निवडणुकीत काय झालं होतं?

वाशिम विधानसभा मतदारसंघ:

वाशिम विधानसभा हा अनुसूचित राखीव असलेला मतदारसंघ भाजपचा गड समजला जातो. वाशिम विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार लखन मलिक यांनी विजयाची हॅट्ट्रिक केली आहे.

त्यामुळे त्यांचे भाजपमध्ये वजन वाढले आहे. 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या लखन मलिक यांना 66,159 मते मिळाली तर त्यांनी 13,695 मतांनी विजय मिळवत वंचित बहुजन आघाडीचे सिद्धार्थी आकाराम देवळे यांचा पराभव केला. देवळे यांना 52, 564 मते मिळाली.

संघाचे कट्टर आणि मेहतर समाजाचे नेतृत्व करणारे लखन मलिक हे पुन्हा एकदा यावेळेस निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. 2009 ते 2024 पर्यंत मलिक यांनी वाशिम विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले.

मात्र भाजपच्या आमदारांपैकी अत्यंत कमी शिक्षण झालेले लखन मलिक हे विकास करण्यास अकार्यक्षम असल्याचा आरोप पक्षातील लोकाकडून सातत्याने केला जात आहे. त्यामुळे भाजपकडून निवडणूक लढवण्याची इच्छा असलेल्यांची मोठी संख्या आहे.

यामध्ये राहुल तुपसांडे याचं नाव सर्वात आघाडीवर आहे. ते वाशिमचे नगरसेवक आहेत. त्यांच्या आई मीरा तुपसांडे नगराध्यक्ष होत्या तर वडील मोतीराम तुपसांडे नगरसेवक होते. राजकीय वलय असलेले युवा उच्चशिक्षित अशी ओळख असलेल्या राहुल तुपसांडे याचं नाव अग्रस्थानी आहे.

तर श्याम खोडे, दीपक ढोके, संगीता इंगोले आणि माजी आमदार भाजप पुरुषोत्तम राजगुरू हेदेखील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. ठाकरे गटाकडून निलेश पेंढारकर आणि राजा भैया पवार हे इच्छुक आहेत. तर काँग्रेसकडून दिलीप भोजराज, सोनाली जोगदंड, मधुकर जुमडे हे इच्छुक आहेत.

Mahavikas Aghadi Vs Mahayuti
Narendra Modi News : शिंदे, फडणवीस, अजित दादांसमोरच पीएम मोदींनी फुंकले विधानसभेचे रणशिंग

कारंजा विधानसभा मतदारसंघ :

कारंजा मतदारसंघावर एका पक्षाचे वर्चस्व राहिले नाही. भाजपने याठिकाणी सलग दोन वेळा विजय मिळवला आहे. 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश डहाके हे आमदार म्हणून निवडून गेले होते. मात्र 2014 मध्ये त्यांचं तिकीट कापून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री सुभाष ठाकरे यांना उमेदवारी दिली आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला.

या मतदारसंघातून 2004 ते 2009 मध्ये या मतदारसंघात शिवसेनेचे राजेंद्र पाटणी निवडून गेले होते. त्या पूर्वी बाबासाहेब धाबेकर काँग्रेसकडून निवडून गेले होते. 2019 च्या निवडणुकीत भाजपचे राजेंद्र पाटणी यांना 73,205 मते मिळाली पाटणी यांनी 22,724 मतांनी विजय मिळवला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश डहाके यांना 50,481 मते मिळाली होती. मात्र, आता परिस्थिती वेगळी आहे. राज्याच्या राजकारणात शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे दोन गट पडले आहेत. भाजपचे विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. माजी आमदार प्रकाश डहाके याचं कोरोनाने निधन झाले.

या मतदारसंघात भाजपकडून राजू पाटील राजे, आमदार पुत्र ज्ञायक पाटणी हे दोघे इच्छुक आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सईबाई डहाके, युसुफ पुंजानी, जिल्हापरिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे हे निवडणुकीसाठी इच्छुक आहेत.

तर शरद पवार गटाकडून डॉ. श्याम राठोड, शिवसेना शिंदे गटाकडून डॉ. अमित चव्हाण हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. प्रहारकडून मानोरा नगरपंचायतचे नगराध्यक्ष हेमेंद्र ठाकरे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. महायुतीच्या कोणत्या पक्षाला उमेदवारी मिळते ते पहावे लागेल. मात्र या मतदारसंघात तिरंगी लढत होणार हे निश्चित आहे.

Mahavikas Aghadi Vs Mahayuti
MVA News : 'मविआ'त जागावाटपावरून मतभेद; काही मतदारसंघावरून होणार वाद, 'या' बड्या नेत्याने दिली कबुली

रिसोड विधानसभा मतदारसंघ :

रिसोड विधानसभा मतदारसंघाची काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. याठिकाणी आमदार अमित झनक यांनी विजयाची हॅट्रिक केली होती. रिसोड मतदारसंघात झनक यांना 69,875 मते मिळाली त्यांनी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार अनंतराव देशमुख यांचा 2,141 मताने पराभव केला. देशमुख यांना 67,734 मते मिळाली होती.

या मतदार संघातून आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी पाहावयास मिळते. काँग्रेस सोडून भाजपवासी झालेल्या अनंतराव देशमुख आणि पुत्र नकुल देशमुख भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.

कॉंग्रेसच्या गडाला सुरुंग लावणारे, सलग दोन वेळा विजय मिळवणारे माजी आमदार विजयराव जाधव हे इच्छुक असून ते उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशिल आहेत. दुसरीकडे लखन ठाकूर, सुनील पाटील यांच्यासह महायुतीतील शिंदे गटाच्या शिवसेनेच्या काही जणांचे नाव चर्चेत आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाकडून दिलीप जाधव यांच्या नावाची चर्चा आहे.

दुसरीकडे या मतदारसंघात स्वाभिमानीचे युवक प्रदेशाध्यक्ष दामू अण्णा इंगोले हे रिंगणात उतरणार आहेत. तर वंचित बहुजन आघाडीही आपला उमेदवार उतरवणार असून किरण गिर्हे हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. प्रशांत गोळे आणि रविंद्र मोरे हेदेखील वंचित बहुजन आघाडीकडून दावा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे रिसोड मतदारसंघात चौरंगी लढत होणार हे निश्चित आहे.

Mahavikas Aghadi Vs Mahayuti
Jayant Patil : महाराष्ट्र नव्हे, सरकार गुलाबी झालंय; जयंत पाटील यांचा सरकारवर निशाणा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com