Mumbai News : वडिलांच्या जीवनासाठी स्वतःची किडनी देण्याचा निर्णय घेत मुलीने केवळ कर्तव्य नाही, तर अपार प्रेमाची पराकाष्ठा दाखवली आहे. मुलीचा आईपेक्षा बापावर जास्त जीव असतो हे सर्वांनी अनुभवलेले आहे. अशातच आता बापासाठी लेकीने आपली किडनी दान केल्याचे समोर आले आहे. आमदार विजय शिवतारे यांना मुलगी ममता शिवतारे यांनी किडनी दान दिली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात 'या' बाप लेकीच्या नात्याची चर्चा होत आहे. मुंबईत सोमवारी किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया पार पडली. या दोघांचीही प्रकृती सध्या स्थिर असल्याचे हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात आले. आमदार शिवतारे यांना पाच वर्षांपूर्वी हृदयविकाराच्या झटका आला होता. त्यावेळी ही त्यांच्या ममता या मदतीला धावून आल्या होत्या.
पुरंदरचे आमदार व माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) गेल्या काही दिवसापासून किडनी फेल झाल्यामुळे डायलिसिसवर होते. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती. या कठीणकाळात त्यांच्या आयुष्यात आशेचा किरण बनून त्यांची लेक डॉ. ममता विजय शिवतारे पुढे आली. तिने विजय शिवतारे यांना किडनी दान देण्याचा निर्णय घेतला.
एक डॉक्टर, एक कर्तव्यदक्ष मुलीमुळे वडिलांना नवजीवन मिळाले आहे. त्यामुळेच देवदूत ठरलेल्या ममता यांचे कौतुक होत आहे. मुंबईत सोमवारी किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया पार पडली. या शस्त्रक्रियेनंतर दोघांचीही प्रकृती सध्या स्थिर आहे, असे हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात आले.
हा एका लेकीचा त्याग, एका कुटुंबासाठी नाही, तर संपूर्ण पुरंदर आणि महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरत आहे. आमदार शिवतारे यांना मुलगी ममता शिवतारे यांनी किडनी दान दिली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात 'या' बाप लेकीच्या नात्याची चर्चा होत आहे.
विजय शिवतारे, हे शिवसेनेचे आमदार आहेत. ते 2009 मध्ये आणि पुन्हा 2014 मध्ये पुरंदर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र त्यांना 2019 च्या विधानसभा निवडणूकीत पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र 2024 मध्ये ते पुन्हा निवडून आले. याआधी २०१४ मध्ये महायुती सरकारमध्ये ते राज्यमंत्री होते.
दरम्यान, पाच वर्षांपूर्वी आमदार शिवतारे यांच्या कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आल्यानंतर त्यांना हृदयविकाराच्या झटका आला होता. त्यावेळी ममता या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये धावून गेल्या होत्या. त्यावेळी ही त्यांनी हॉस्पिटलमध्ये थांबून त्यांच्या तब्येतेची काळजी घेतली होती. शिवतारे यांच्या कन्या ममता या सेवानिवृत्त दबंग पोलीस अधिकारी ओळख असलेल्या शिवदीप लांडे यांच्या पत्नी आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.