Vijay Wadettiwar News : परिवहन विभागातील 'आरटीओ'मध्ये एका निवृत्त अधिकाऱ्याकडून वसुली रॅकेट चालवले जात आहे. या वसुलीतील 90 टक्के रक्कम त्याच्या खिशात जात असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. त्याच्या या वसुलीला विरोध करणाऱ्या आरटीओ अधिकाऱ्याला एससीबीच्या मार्फत खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आल्याचे देखील त्यांनी म्हटले.
ते म्हणाले, निवृत्त अधिकारी बजरंग खरमाटे हे परिवहन विभागातील वसुली रॅकेटचे सूत्रधार आहेत. परिवहन विभागाच्या वसुलीतील तब्बल 90 टक्के मुद्देमाल हा या खरमाटेच्या खिशात जातो. चंद्रपूर जिल्ह्यात मोटर वाहन निरीक्षक पवन पोटदुखे यांच्यावर एसीबीची झालेली कारवाई ही सुडबुद्धीने करण्यात आलेला पूर्वनियोजित कट आहे.
आरटीओमध्ये रुजू झालेल्या विदर्भातील 64 अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीत काही अधिकारी अडथळा आणत आहेत. जे अधिकारी वसुलीला नकार देतात त्यांना एसीबीच्या जाळ्यात अडकवण्याची, बदली करण्याचे धमकी दिली जाते. याबाबत मुख्यमंत्री व परिवहन मंत्र्यांनी चौकशी करावी अशी आमची वडेट्टीवार यांनी केली आहे.
या रॅकेटमध्ये अकोल्याचे आरटीओ अधिकारी भुयार सहभागी असल्याचे देखील वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. वसुलीसाठी ते अकोल्यात बसतच नाहीत ते नागपूरातच असतात. निलंबित राजू नागरे, योगेश खैरनार आणि भुयार ही मंडळी महाराष्ट्रातील कलेक्शन करतात.
ते बदल्यांमध्ये पूर्ण सक्रीय असतात. खैरनार वसुलीसाठी सगळ्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकतो. वाहनचालक-मालकांचे त्याने रॅकेट तयार केले आहे. ओव्हरलोड गाड्या करा असे तो सांगतो. खरमाटे हा यंत्रणेला, अधिकाऱ्यांना धमकतो, असे देखील त्यांनी सांगितले.
परिवहन विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व छळवणुकीच्या घटना घडत आहे. आरटीओ विभागातील बदल्या, बेकायदेशीर वसुली, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करणे असे गैरप्रकार परिवहन विभागात सुरू आहेत, असा आरोप देखील वडेट्टीवार यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.