Vijay Wadettiwar | Manoj Jarange Patil Sarkarnama
महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : 'मनोज जरांगेंशी तडजोड, सरकारची भूमिका संशयास्पद, ओबीसी...', विजय वडेट्टीवार व्यक्त केली मोठी भीती

Vijay Wadettiwar on reservation concern : जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकाराची भूमिका संशयास्पद असल्याचे वक्तव्य केले आहे.

Roshan More

Vijay Wadettiwar on Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी सकाळी आपले उपोषण स्थगित केले. सरकराने त्यांना पाच मागण्या मान्य करण्याची हमी दिली आहे. दरम्यान, जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरु राहणार असल्याचे सांगत सरकारला मागण्या मान्य करण्यासाठी 90 दिवसांचा कालावधी दिला आहे.

जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, सरकारची भूमिका संशयास्पद वाटत आहे. ओबीसींच्या हक्कांशी तडजोड करून कोणताही निर्णय मान्य नाही.

पुढे बोलताना ते म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांनी २० दिवसांचे उपोषण स्थगित करून महाराष्ट्र सरकारला तीन महिन्यांची मुदत दिली आहे. या संपूर्ण घडामोडीवर सरकारची भूमिका अत्यंत संशयास्पद वाटत असून, सरकार जरांगे पाटील यांच्यासमोर झुकले तर त्याचा मोठा फटका ओबीसी समाजाला बसण्याची शक्यता आहे.

मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, याला आमचा कधीच विरोध नव्हता. मात्र एका समाजाला न्याय देताना दुसऱ्या समाजाच्या घटनात्मक हक्कांवर गदा येता कामा नये. ओबीसींचे हक्क कमी करून किंवा त्यांच्यावर अन्याय करून कोणताही निर्णय घेतला, तर त्याला आमचा ठाम विरोध राहील, असा इशारा देखील त्यांनी दिला.

ओबीसींच्या हक्कावर गदा नको...

ओबीसी समाजातील ३७८ जातींपैकी सुमारे २०० जाती आजही अत्यंत आर्थिकदृष्ट्या मागास आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या हक्कांवर गदा आणणे म्हणजे त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक भवितव्याशी खेळ करण्यासारखे आहे.मराठा समाजाला न्याय मिळावा, पण ओबीसींच्या घटनात्मक हक्कांची किंमत मोजून नाही, असे देखील त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT