Vijay Wadettiwar and Ajit Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Vijay Wadettiwar On Ajit Pawar News : 'बेटा अजित कितना खाया, सरदार..' ; विजय वडेट्टीवारांनी अजित पवारांवर साधला निशाणा!

Vijay Wadettiwar Vs Mahayuti Goverment : राज्यात प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. तसेच, लाडकी बहीण म्हणतात मात्र लाडक्या बहिणीवर सर्वाधिक अत्याचार ह्या महाराष्ट्रात सुरू असल्याचेही म्हणाले आहेत.

Mayur Ratnaparkhe

Vijay Wadettiwar speech at the farmers meeting : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना, 'बेटा अजित कितना खाया, सरदार ७० हजार कोटी..बहुत खाया..ये ले तिजोरी की चाबी रख..' असं म्हणत खिल्ली उडवली.

तसेच, राज्यात प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप वडेट्टीवार(Vijay Wadettiwar) यांनी केला. लाडकी बहीण म्हणतात मात्र लाडक्या बहिणीवर सर्वाधिक अत्याचार ह्या महाराष्ट्रात सुरू असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. ते आज नाशिकच्या चांदवड येथील माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त आयोजित शेतकरी मेळाव्या प्रसंगी बोलत होते..या मेळाव्यात त्यांनी सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली.

या सरकारने महागाई गगनाल भिडवली आहे. राज्यात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत, शेतकऱ्यांना बोगस बियाणे - खते याचा फटका बसत आहे. अमरावती जिल्ह्यात खतांच्या नावाखाली माती विकल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे? कृषी मंत्र्यांचे आपल्या खात्याकडे लक्षच नाही हे स्पष्ट होत आहे! बोगस खत आणि बियाण विरोधात मोठी वल्गना करून कायदा आणू म्हटले होते, तो कायदा पण बासनात गुंडाळला.

आधीच पीडित असलेल्या बळीराजाचे अजून किती हाल करणार आहेत? कृषी खात शेतकऱ्यांसाठी काम करते की या कंपन्यांसाठी? असे प्रश्न उपस्थित करत वडेट्टीवारांनी आरोपही केले.

दरम्यान, मनोज जरांगे(Manoj Jarange) यांनीउपोषण स्थगित केले आहे, यावरून आम्ही त्यांचे स्वागत करत असल्याची प्रतिक्रियाही विजय वडेट्टीवार यांनी दिली. तसेच ते म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत सरकार केवळ आश्वासन देत आहे, पण पुढे काहीच होत नाही. सरकार तारीख पे तारीख करत आहे. विरोधक बैठकीला येत नाही म्हणतात, पण मग आमची गरजच काय? तुमच्या पक्षाला बहुमत आहे, तत्काळ निर्णय घ्या, असं वडेट्टीवारांनी म्हटलं आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT