Vijay Wadettiwar Vs Deepak Kesarkar Sarkarnama
महाराष्ट्र

Chhatrapati Shivaji Maharaj Statue : मंत्री केसरकरांनी पाजळलेल्या अक्कलेवर वडेट्टीवार म्हणाले, "महाविनाशी सरकार..."

Vijay Wadettiwar Vs Deepak Kesarkar : छत्रपती शिवाजी महाराज यांचा कोसळलेल्या पुतळ्यावर शिवसेनेचे नेते मंत्री दीपक केसरकर यांनी 'अपघात' असल्याचे म्हटले, त्यावर काँग्रेसचे विजय वडेट्टीवार चांगलेच संतापले आहेत.

Pradeep Pendhare

Mumbai News : सिंधुदुर्घ जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळण्याच्या घटनेला शिवसेना नेते मंत्री दीपक केसरकर यांनी 'अपघात' असल्याचे म्हटले. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हाच अपघात शब्द पकडत मंत्री केसरकर यांनी त्यांच्या सरकारला चांगलेच सुनावले.

"सरकारचं सर्व काही अपघाती आहे. अपघाताने आलेल्या सरकारचं सगळं कामकाज अपघाती आहे. महाराष्ट्राच्या नशिबात हे महाविनाशी सरकार आले हाच महाराष्ट्रातील जनतेसाठी मोठा अपघात आहे", असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेवर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. महाविकास आघाडीने राज्यभरात आंदोलन करत महायुती भाजप सरकारचा निषेध नोंदवत आहे. यातच शिवसेनेचे (Shiv Sena) नेते मंत्री दीपक केसकर यांनी हा, 'अपघात' होता, काहीतरी चांगलं होण्यासाठी वाईट घडत असते, अशी प्रतिक्रिया दिली.

मंत्री केसरकर यांच्या या प्रतिक्रियेवर देखील टीका होऊ लागली आहे. मंत्री केसरकर यांच्या प्रतिक्रियेमुळे सरकारची अधिकच अडचण झाली आहे. त्यांनी पाजळलेल्या अक्कलेवर सत्ताधारी प्रमुख मंत्री आणि नेते, देखील खासगीत नाराजी व्यक्त करत आहेत. यातच काँग्रेस (Congress) नेते तथा विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मंत्री केसरकर यांचा 'अपघात' या शब्द पकडत चांगलेच सुनावले आहे.

"विजय वडेट्टीवार यांनी एक्स खात्यावर पोस्ट शेअर केली आहे. अपघाताने आलेल्या सरकारचं सगळं कामकाज आपघाती आहे! महाराष्ट्राच्या नशिबात हे महाविनाशी सरकार आले हाच महाराष्ट्रातील जनतेसाठी मोठा अपघात आहे. ज्यातून या राज्याला सावरायला खूप वेळ जाईल", असे टोला वडेट्टीवार यांनी लगावला आहे.

सर्व अपघातच...

बदलापूर घटना, समृद्धी महार्गावरील अपघात, नांदेड रुग्णालयातील आगीचे प्रकरण, ठाणे रुग्णालयातील बालकांचे मृत्यू, राज्यात ड्रग्जचा सुळसुळाट, ललित पाटील प्रकरण, महिलांवर अत्याचार, असं सर्व काही काढत, हे अपघातच आहे, असा टोला वडेट्टीवार यांनी सरकारला लगावला.

रखवाला दाखवण्यासाठी धडपड

तीन ड्रायव्हर आणि एक स्टिअरींग असल्यावर स्टिअरींग हातात घेण्यासाठी मीच किती मोठा जनतेचा रखवाला हे दाखवण्यासाठी जी धडपड तिघांची सुरू आहे ना, त्यामुळेच हे सगळे अपघात घडत आहे, असे देखील विजय वडेट्टीवार यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT