Vijay Wadettiwar, Eknatha Shinde sarkarnama
महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : तलाठीभरतीसाठी 10 लाख, उत्तरासाठी 3 लाख; विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

Talathi Recruitment Scam : खासगी संस्थेने तलाठीभरतीची परीक्षा घेतली, मात्र त्याच कंपनीचे कंत्राटी कर्मचारी घोटाळ्यात सामील

Roshan More

Political News : तलाठीभरती परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात येतो आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी हे सगळे आरोप फेटाळले आहेत. विद्यार्थ्यांच्या नुकसानासाठी थेट बदनामीचा दावा दाखल करण्याचा इशारा विखे-पाटील यांनी दिला होता. मात्र, घोटाळा झाल्याच्या आरोपावर विरोधी पक्ष ठाम आहे. याप्रकरणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून परीक्षा घेणाऱ्या संस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

राज्यातील परीक्षा घोटाळ्यांवर सरकारने श्वेतपत्रिका काढावी, तसेच सर्व परीक्षा एमपीएससीमार्फत घेण्यात याव्यात, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे पत्राद्वारे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. घोटाळ्यामध्ये ज्या खासगी कंपनीकडून ही परीक्षा घेण्यात आली होती, त्यातील कर्मचारी सहभागी असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार( Vijay Wadettiwar) यांनी केला आहे.

सरकारने खासगी आयटी कंपन्यांना नफा मिळवून देण्याचा उद्योग बंद करायला हवा. सरकारच्या दुर्लक्षामुळे राज्यातील बेरोजगारांचे भवितव्य घोटाळेबाजांच्या दावणीला बांधले गेले आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.

पेपरफुटीची वाढती प्रकरणे लक्षात घेता पारदर्शक पद्धतीने परीक्षा होण्यासाठी खासगी कंपन्यांना देण्यात आलेली मुदतवाढ रद्द करण्यात यावी. पेपरफुटीचा आरोप होत असलेली सध्याची तलाठी पदभरती रद्द करावी. या परीक्षेसंदर्भात होत असलेल्या आरोपांची सरकारने गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. या संपूर्ण पदभरतीची सखोल चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी, अशी मागणी आपल्या पत्राद्वारे वडेट्टीवार यांनी केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईतून पेपरफुटीच्या रॅकेटमध्ये खासगी कंपनीचे कंत्राटी कर्मचारी सहभागी असल्याची माहिती पुढे येत आहे. आऊटसोअर्स केलेल्या खासगी सेंटरवरील 19 हून अधिक गुन्हे गेल्या वर्षभरात राज्यभर दाखल झाले आहेत. या सर्व गुन्ह्यांमध्ये किमान 9 आरोपी समान आहेत आणि त्यांची मोडस ऑपरेंटीसारखीच आहे. दहा लाखांत तलाठी व्हा! थेट परीक्षा केंद्रात उत्तरपत्रिका मिळवा! अशा पद्धतीने उमेदवारांना आमिष दाखविले जात आहे, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे.

उत्तरासाठी तीन लाख

परीक्षा सुरू होताच काही वेळांत प्रश्नपत्रिका बाहेर येतात. या परीक्षेत उत्तरे पुरविण्यासाठी 3 लाख रुपये घेतले जातात. तळपायाला चिप लावून हिडन कॅमेऱ्याचा वापर करून प्रश्नपत्रिका स्कॅन केली जाते. हे सगळे प्रकार समोर आले आहेत. तरीही सरकार गंभीर नाही, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT