Ambadas Danve : राणे, विखे, मुंडे, राणाजगजितसिंह...; अंबादास दानवेंनी मुख्यमंत्र्यांना भाजपातील 'घराणेशाही'ची यादीच दिली

Ambadas Danve On Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घराणेशाहीचा आरोप केला होता.
Ambadas Danve and Eknath Shinde
Ambadas Danve and Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Marathwada News : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा एक महत्त्वाचा अंक बुधवारी पार पडला. शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल देताना विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदेंची शिवसेनाच खरी शिवसेना यावर शिक्कामोर्तब केले. या निकालानंतर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घराणेशाहीचा आरोप केला होता. त्याला आज ठाकरे गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे यांच्यावर तुम्ही ज्या भाजपची पालखी धापा टाकत वाहत आहात, त्यांच्या घराणेशाहीची यादी एकदा बघा, असा टोला लगावत भलीमोठी यादीच दिली. शिवसेनानेते संजय राऊत यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घराणेशाहीचा समाचार घेताना मुलाला खासदारकीची उमेदवारी घेताना तुम्हाला घराणेशाही दिसली नाही का? असा रोखठोक सवाल केला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ambadas Danve and Eknath Shinde
Rajan Salvi : मला अटक केली तरी चालेल, ACB कार्यालयात येणार नाही; साळवी अधिकाऱ्यांवर संतापले

आता महाराष्ट्राच्या राजकारणात घराणेशाहीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. अंबादास दानवे यांनी समाजमाध्यमातून एकनाथ शिंदे आणि भाजपला घराणेशाहीवरून आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महोदय, ज्या महाराष्ट्रात आपण आणि आपल्या गटाचे 40 आमदार महाराष्ट्र भाजपची पालखी धापा टाकत वाहत आहात, त्याच भाजपची महाराष्ट्रातील घराणेशाही एकदा बघा. 2019 मध्ये महाराष्ट्रातील भाजपचे विधानसभेचे उमेदवार आणि त्यांचा कौटुंबिक राजकीय वारसा देतो आहे. पाहा, वाचा कारण याचे उत्तर तुम्हाला द्यावे लागणार आहे. यापुढे देशाची यादी लागली तरी सांगा, असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला आहे.

  • 1. देवेंद्र फडणवीस (भाजपचे गंगाधरराव फडणवीस यांचे सुपुत्र)

  • 2. पंकजा मुंडे (माजी केंद्रीयमंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या)

  • 3. आकाश फुंडकर (भाजपाचे दिवंगत नेते पांडुरंग फुंडकर यांचे सुपुत्र)

  • 4. संतोष दानवे (सध्याचे केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांचे सुपुत्र)

  • 5. सुनील कांबळे (दिलीप कांबळे यांचे सुपुत्र)

  • 6. सिद्धार्थ शिरोळे (माजी खासदार अनिल शिरोळे यांचे सुपुत्र)

  • 7. हेमंत सावरा (विष्णू सावरा यांचे सुपुत्र)

  • 8. संदीप नाईक (भाजपनेते गणेश नाईक यांचे सुपुत्र)

  • 9. भरत गावित (माणिकराव गावित यांचे सुपुत्र)

  • 10. मदन भोसले (प्रतापराव भोसले यांचे सुपुत्र)

  • 11. स्नेहलता कोल्हे (शंकरराव कोल्हे यांच्या सूनबाई)

  • 12. मोनिका राजाळे (राजीव राजाळे यांच्या पत्नी)

  • 13. देवयानी फरांदे (एन. एस. फरांदे यांच्या सूनबाई)

  • 14. समीर मेघे (दत्ता मेघे यांचे सुपुत्र)

  • 15. राणाजगजितसिंह पाटील (पद्मसिंह पाटील यांचे सुपुत्र)

  • 16. संभाजी निलंगेकर (रुपाली निलंगेकर यांचे सुपुत्र)

  • 17. राहुल कुल (सुभाष कुल यांचे सुपुत्र)

  • 18. नमिता मुंदडा (स्व. विमल मुंदडा यांच्या सूनबाई)

  • 19. राधाकृष्ण विखे-पाटील (बाळासाहेब विखे-पाटील यांचे सुपुत्र)

  • 20. वैभव पिचड (मधुकरराव पिचड यांचे सुपुत्र)

  • 21. नीतेश राणे (नारायण राणे यांचे सुपुत्र)

रस्त्यावरील शिवसैनिक पारखून, त्याला निवडून आणण्याचे काळीज फक्त शिवसेनेत होते... आहे आणि राहणार! आयात उमेदवारांची जत्रा तुम्ही तुमच्या खांद्यावर घेऊन फिरत आहात. कायदेशीर लढाया येतील आणि जातील. कायम असेल ती निष्ठा आणि विश्वास, असा जोरदार हल्लाबोल अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री आणि भाजपवर चढवला.

(Edited By- Ganesh Thombare)

R...

Ambadas Danve and Eknath Shinde
MLA Disqualification Case : नार्वेकरांनी दिलेला निकाल म्हणजे घराणेशाहीला चपराक; मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंना डिवचलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com