Vijay Wadettiwar Sarkarnama
महाराष्ट्र

Cabinet Meeting Decision : ‘राज्यमाता-गोमाता’ निर्णय; विजय वडेट्टीवार म्हणाले, 'अरे कितीही जुमलेबाजी'

Pradeep Pendhare

Mumbai News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशी गायींना ‘राज्यमाता-गोमाता’ म्हणून घोषित करण्याचा निर्णयावरून विरोधकांनी टीका सुरू केली आहे.

शिवसेना 'UBT' नेता आनंद दुबे यांच्यानंतर काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील महायुती भाजप सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

काँग्रेसचे नेते तथा विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारच्या या निर्णयावरून भाजपला झोंबणारे ट्विट केले आहे. 'राजकारण भाजपसाठी (BJP) धंदा, म्हणून निवडणुकीवेळी गायीला वंदा आणि निवडणुकीनंतर गाईच्या गळ्यात फंदा!', अशा खोचक शब्दात विजय वडेट्टीवार यांनी ट्विटची सुरवात करत महायुती सरकारवर हल्लाबोल चढवला.

विजय वडेट्टीवार (Congress) यांनी म्हटले आहे की, "विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता महायुती सरकारला गाय आठवली आहे. जेव्हा दुष्काळ होता, त्यावेळी चारा आणि पाण्याशिवाय तडफडत असताना गाय आठवली नाही". गायची मांस निर्यात करणाऱ्याकडून चंदा घेताना गायक रुपी माय आठवली नाही, याचीही आठवण विजय वडेट्टीवार यांनी करून दिली आहे.

त्यावेळी दूध उत्पादक आठवला नाही!

मध्यंतरी राज्यात दुधाच्या भावासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी खूप संघर्ष केला. राज्यभर आंदोलन पेटले होते. त्याची आठवण करून देताना विजय वडेट्टीवार यांनी, 'दुधाला भाव मिळत नसताना शेतकरी संकटात होता, तेव्हा गाय आठवली नाही. निवडणुकीच्या तोंडावर गाय ही राज्यमाता ही आठवण बरोबर झाली', असा खोचक प्रश्न केला आहे.

निवडणुकीच्या तोंडावरची जुमलेबाजी...

शिवसेना 'UBT' नेता आनंद दुबे यांनी असे निर्णय घेऊन काय साध्य करत आहे, असा सवाल केला होता. महाराष्ट्रातील जनतेला सर्व काही माहीत आहे आणि हा निर्णय कशासाठी घेतला आहे, याची देखील कल्पना आहे, असे सांगून विकास कामांचा हिशोब द्या, अशी मागणी केली होती. विजय वडेट्टीवार यांनी ट्विटच्या शेवटी 'अरे, किती जुमले करणार निवडणुकीच्या तोंडावर', असा सवाल केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT