Cabinet Meeting Decision : देशी गायींना 'राज्यमाता-गोमाता' दर्जा; शिवसेना 'UBT' नेता म्हणाला, 'ठाकरेंनी पूजा केली, यांच्या प्रमाणपत्राची...'

Shiv Sena 'UBT' leader reaction to 'Rajyamata Gomata' status for indigenous cows : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशी गायींना ‘राज्यमाता-गोमाता’ म्हणून घोषित करण्याचा निर्णयावर शिवसेना 'UBT' नेत्याची प्रतिक्रिया.
Cabinet Meeting Decision
Cabinet Meeting DecisionSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : निवडणूक आयोगाचं केंद्रीय पथक घेऊन गेल्यानं विधानसभा निवडणुकांची कधीही घोषणा होण्याची परिस्थिती आहे. यामुळे महायुती सरकारने निर्णयांचा धडका लावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशी गायींना ‘राज्यमाता-गोमाता’ म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून आता राजकारण तापू लागलं आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आनंद दुबे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. "हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे गायची पूजा करायचे, त्यामुळे या निर्णयातून महायुती सरकारने आम्हाला शिकवू नये. त्यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही", असा टोला आनंद दुबे यांनी लगावला आहे.

शिवसेना 'UBT' नेता आनंद दुबे म्हणाले, "या निर्णयातून महायुती भाजप (BJP) सरकार नेमकं काय सिद्ध करू पाहत आहे, हेच कळत नाही. महाराष्ट्रातील जनता सगळं माहिती आहे आणि पाहत देखील आहे". आम्ही गाय माताला आमची माताच मनतो. गायीला मातेचा दर्जा देण्यासाठी यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही. आम्ही खरे सनातनी आहोत. आम्ही हिंदू आहोत, असेही आनंद दुबे यांनी ठणकावून सांगितलं.

Cabinet Meeting Decision
Sharad Pawar : 'या' बड्या नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कुणाला लागणार तिकीटाची लॉटरी?

"हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) गायीची पूजा करायचे. त्यामुळे आम्हाला शिकवू नका. जनतेला देखील शिकवू नका, विकासाच्या मुद्यावर बोला. त्यावर तुमचे सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे", असा टोला देखील आनंद दुबे यांनी लगावला आहे. शिवसेना (Shiv Sena) 'UBT' नेता आनंदु दुबे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे या निर्णयावरून राज्यातील राजकारण तापणार असं दिसतं आहे.

Cabinet Meeting Decision
MNS News: देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात मनसेचा उमेदवार ठरला?

काय आहे निर्णय

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील महायुती भाजप सरकारची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत धडाकेबाज 38 निर्णय झाले. यात राज्य सरकारनं देशी गायींना ‘राज्यमाता-गोमाता’ म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावावर सुरवातीला चर्चा झाली आणि शेवटी तो मान्य करण्यात आला. यासंदर्भातला सरकारी आदेश जारी करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com