Dhananjay Munde : "भाजप सोडून जाताना आम्हाला दोष का देता?" धनंजय मुंडे कोणावर संतापले?

Mahayuti News : बीडमधील महायुतीत सारं काही आलबेल नसल्याचं दिसून येत आहे. भाजप आमदार आणि एका नेत्यानं धनंजय मुंडे यांच्यासह अजितदादांवरही नाराजी व्यक्त केली आहे.
Dhananjay Munde
Dhananjay MundeSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics: अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीनं 2023 मध्ये महायुतीत 'एन्ट्री' केली. तेव्हापासून शिवसेना ( शिंदे गट ) आणि भाजपमधील नेत्यांचे अजितदादांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांशी खटके उडाल्याचं पाहायला मिळत आहे. असाच काहीसा प्रकार बीडमध्ये समोर आला आहे. भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांच्यापाठोपाठ माजलगावमधील भाजप नेते, मोहन जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर नाराजी व्यक्त करत टीका केली आहे.

निवडणूक लढणार नाही...

"पालकमंत्री ऐकत नाहीत. त्यामुळे राजकारण करायचे तरी कशाला?" असं म्हणत भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांच्यावर तोफ डागत कुटुंबातील कुणीच विधानसभा निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

अजितदादांमुळे निष्ठावतांची अडचण....

"आमच्या पक्षाला दुर्भाग्य सुचलं आणि चांगले सुरु असताना अजितदादांना बरोबर घेतले. त्यामुळे निष्ठांवत लोकांची अडचण झाली," अशी नाराजी भाजप ( Bjp ) नेते, मनोज जगताप यांनी व्यक्त केली.

Dhananjay Munde
Sharad Pawar : शरद पवार देणार भाजपला दुसरा धक्का; बडा नेता गळाला?

आम्हाला का दोष देता?

लक्ष्मण पवार आणि मनोज जगताप यांच्या भूमिकेनंतर बीडमधील महायुतील सारं काही अलबेल नसल्याचं दिसून आलं आहे. मात्र, भाजप सोडून जाताना आम्हाला का दोष देता? असा थेट सवाल धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे. ते मंत्रालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

Dhananjay Munde
Mahayuti Politics : पंकजा मुंडेंच्या लोकसभेला ‘गार’ पण स्वत:च्या विधानसभांचा 'निर्धार'

आम्ही तुमच्या नजरेत दोषी...

धनंजय मुंडे म्हणाले, "गेवराई विद्यमान आमदार आणि माजलगावमधील नेत्यानं माझ्यावर आणि अजितदादांवर टीका केली. यांना नॅरेटिव्ह सेट करायचे आहे. त्यांनी दोष त्यांच्या पक्षाला दिला पाहिजे. आम्हाला दोष देऊन काय उपयोग? सरकारमध्ये सामील होण्यापूर्वी आमचं आणि त्यांचं वैर होते. तुम्हाला भाजपच्या लोकांना दोष देता येत नाही. पण, आम्ही तुमच्या नजरेत काही दिवसांत दोषी होतो. हे अतिशय चुकीचं चालू आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com